पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते थाटात उदघाटन ग्रंथदिंडी , वेशभूषा , लेझीम पथकाने वेधले नगरवासीयांचे लक्ष

    154
    Advertisements

     

    चंद्रपूर- झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मुल यांच्या वतीने पहिल्यांदाच पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन राष्ट्रमाता जिजाऊ नगरी बालविकास प्राथमिक शाळा मुल येथे रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 ला पार पडले. संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांचे उपस्थितीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते उद्घाटन ,प्रा. रत्नमाला ताई भोयर यांचा प्रातिनिधीक कवितासंग्रह हीरदयातील खपली व सुनिता बुटे यांच्या मनभावना कवितासंग्रहाचे प्रकाशन तसेच झाडीबोली महिलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
    या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नवभारत विद्यालयपासून गांधी चौक ते बालविकास प्राथमिक शाळेपर्यंत निघणाऱ्या ग्रंथदिंडीत लोककला व लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा , लेझीम, बँडपथक , कवायती आणि वैशिष्ट्यपूर्ण झाकी प्रदर्शित करण्यात आली . मूल नगरीतील शिक्षक , सर्व कर्मचारी व विद्यार्थी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. झाडी गौरवासाठी शाहीर नंदकिशोर मसराम व गायिका विद्या कोसे यांच्या स्वरांची जुगलबंदी रंगली . आहे .
    दुसऱ्या टप्प्यात लोकगीते आणि स्त्री साहित्य यावर प्रकाश टाकण्यासाठी डॉ. विशाखा कांबळे नागपूर , डॉ. कल्पना नरांजे नागपूर व रणरागिनी मंचाच्या अध्यक्षा संगीता बढे वर्धा यांचा परिसंवाद पार पडला. तिसऱ्या टप्प्यात झाडीची बहिणाबाई ज्येष्ठ साहित्यिक अंजनाबाई खुणे वडेगाव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन रंगले. त्यात राज्यभरातील अनेक कवयित्रींचा सहभाग होता . याच साहित्य संमेलनात झाडीपट्टीतील साहित्यिकांचा व झाडीबोलीच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले .
    मूल नगरीत झालेल्या घातलेल्या वैविध्यपूर्ण महिला साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्यिक व साहित्य रसिक , आमंत्रित मान्यवर व नागरिकांनी उपस्थिती होती . संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आयोजन मंडळाने अथक परिश्रम घेतले .