ऐतिहासिक ठरवासह सामाजिक सलोखा परिषद संपन्न

    318

    ✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.18डिसेंबर):-कराड येथे सामाजिक सलोखा परिषद मोठ्या उत्साहात व ऐतिहासिक ठराव संमत करून संपन्न झाली.इंडीयन युथ फौंडेशन,मी नागरिक फाऊंडेशन,ब्लड डोनर ,,समतापर्व, संविधान प्रचारक व अग्रणी सोशल फौंडेशन या संस्थांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील निवडक सक्रिय चेतक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    यामध्ये पाटण,सातारा,कराड, खटाव, कुपवाड, इस्लामपूर, पुणे,तासगाव, विटा,वाई, कडेगांव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कॉ.धनाजी गुरव,इंजि.फारुक गवंडी,अॅड.अमीर मणेर, पैगंबर शेख,मिनाज सय्यद यांनी आपापल्या विषयावर मुद्देसूद, तपशीलवार व उदाहरणांसह मांडणी केली.सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे वैचारिक मंथन करणारा हा प्रथमच उपक्रम राबविला जात आहे.ही चळवळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पोहोचवण्यासाठी संयोजकांचा प्रयत्न आहे.

    यावेळी स्वागत व प्रास्ताविक आझाद कालेकर, आभार व कृतीकार्यक्रम वाचन अय्याज शिकलगार, संविधान प्रास्ताविका व राष्ट्रगीत गायन दिपालीताई तर पाहुण्यांची ओळख विद्याधर गायकवाड, अब्बास शिकलगार,इर्शाद खैरतखान,आयुब मुल्ला, शहानवाज पन्हाळकर यांनी करून दिली.यावेळी मुबारक शेख,अझर पटेल,अमर तांबोळी,जस्मीन शेख उपस्थित होते.