कुलदीप जाधव आ. गुट्टे काका मित्रमंडळाचे विधानसभा युवक अध्यक्ष

    289
    Advertisements

    ?आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा मित्रमंडळात प्रवेश

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.5फेब्रुवारी):-गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा विकास कामांचा झपाटा सुरूच असून मतदार संघात अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि जिद्द पाहून मतदार संघातील विविध क्षेत्रातील नागरिक आ.गुट्टे यांच्याशी जुडत असून यात असंख्य तरुण सोबत येत आहेत.

    गंगाखेड तालुक्यातील मौजे धरासुर येथील श्री कुलदीप दत्तराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो तरुणांनी काल ०४ फेब्रुवारी रोजी राम सीता सदन जनसंपर्क कार्यालय गंगाखेड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. श्री प्रल्हादराव मुरकुटे, जिल्हा परिषद माजी सदस्य श्री किशनराव भोसले, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णाजी सोळंके, गंगाखेड तालुका अध्यक्ष श्री रामप्रसाद सातपुते, माजी उपनगराध्यक्ष श्री राधाकिशन शिंदे, माजी नगर सेवक श्री सत्यपाल साळवे, श्री नागनाथ कासले, श्री उध्दव शिंदे, नितीश खंदारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    या प्रसंगी मौजे धारासुर येथील श्री संदीप बंशिधर जाधव, श्री प्रदीप सोळंके जवळेकर, श्री धनंजय श्रीमंतराव जाधव, श्री राम महादेव जाधव, श्री आकाश बालासाहेब जाधव, श्री संकेत संदीप जाधव, चैतन्य रमेशराव जाधव, उमाकांत महारुद्र रनबावरे, श्री सिद्धेश्वर बाबासाहेब जाधव, श्री ओमकार रमेशराव जाधव, श्री सखाराम हरिभाऊ जाधव, श्री ऋषिकेश उत्तमराव जाधव, श्री परिक्षीत विश्वनाथराव जाधव, श्री अनंता सरांडे, श्री सुरेश जाधव, श्री प्रद्युम्न विश्वनाथराव जाधव, श्री माऊली गणेशराव जाधव, श्री कृष्णा बबनराव यादव, श्री सचिन भागवत नागठाणेकर, श्री राम ढेबरे, श्री राम साखरे यांच्यासह शेकडो तरुणांनी गुट्टे काका मित्रमंडळामध्ये प्रवेश केला. माझ्या कार्यावर विश्वास ठेऊन आज आपण मित्रमंडळात प्रवेश करत आहात या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. विकास कामाबाबत मी आपल्या कायम सोबत असेल असे याप्रसंगी आ. गुट्टे यांनी आवर्जून सांगितले आहे.

    माझ्या गावातील आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुप्तेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. तसेच धरासुर फाटा ते धारासुर या रस्त्याकडे यापूर्वीच्या कोणत्याही आमदारांनी पाहिले नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गावकऱ्यांनी रस्त्याअभावी हाल अपेस्टा सहन केल्या आहेत. आमच्या या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयाकडे आमदार गुट्टे साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून आमचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळेच माझ्यासह धारासुर, जवळा, नागठाना गावातील शेकडो तरुणांनी आ. गुट्टे साहेबांच्या कामावर खुश होऊन गुट्टे काका मित्रमंडळात आज प्रवेश केला आहे.