साकोलीत १८ फेब्रुवारीला “दोन घराचं गाव” शंकरपटानिमित्त मित्रांगण समुहाचे हृदयस्पर्शी नाटक

    92
    Advertisements

     

    साकोली : शहरातील मित्रांगण समुह वतीने शंकरपटानिमित्त रसिकांना मंत्रमुग्ध करणारी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत सर्वस्व गमावून बसलेल्या कुटुंबांची सत्य कहाणी श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगांव प्रस्तुत “दोन घराचं गाव” या नाट्यचा अभिनव प्रयोग रविवार १८ फेब्रुवारी रात्री ९ वाजता होमगार्ड परेड ग्राऊंडवर संपन्न होणार आहे.
    याप्रसंगी उदघाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले, माजी आमदार राजेश काशीवार, बीडीसीसी अध्यक्ष सुनिल फुंडे अध्यक्ष, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, जि.प.सभापती मदन रामटेके, शिक्षण महर्षी डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, प्रा. होमराज कापगते, अश्विन नशिने व इतर मान्यवर हजर असतील.
    सदर “दोन घराचं गाव” या हृदयस्पर्शी नाटकात पदोपदी रसिकांच्या डोळ्यात अश्रू येतात. भ्रष्ट कारभाराशी दोन हात करणारे आदिवासी कुटुंबाच्या रानातील संघर्षमय न्याय हक्कासाठी ही सत्य कहाणी असून सदर नाटक सहपरीवार बघावे असे आवाहन मित्रांगण साकोली कार्यकारीणीचे डॉ. नरेश कापगते, डॉ. अरुण झिंगरे, प्रशांत गुप्ता, सदुभाऊ (शरद) कापगते, दामोदर कापगते, किशोर डोये, छगन पुस्तोडे, ॲड. दिलीप कातोरे, डॉ. सुनील समरीत, रवि परशुरामकर, विजय दुबे, उमेश भुरे, ग्यानिराम गोबाडे, जे.डी. मेश्राम, कुंदन वल्के, तुलसीदास पटले, डी.डी. वलथरे, विनोद भेंडारकर, राम चाचेरे, राधेश्याम मुंगमाडे, बंडू शेंडे, नाटयसहयोगी माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, सुरेश बघेल, पत्रकार रवि भोंगाने, आशिष चेडगे आणि सर्व मित्रांगण साकोलीचे पदाधिकारी व सदस्यगणांनी जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी विलक्षण अनुभवातील या “दोन घराचं गाव” नाट्यप्रयोगाला सहकार्य करावे असे विनंती आवाहन केले आहे.