गेवराई शहरात गाड्या चोरीचे सत्र सुरुच; खाकी वर्दीचा धाकच नाही अहिल्यानगर मधून स्विप्ट कारची चोरी

    82
    Advertisements

     

    बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

    गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह परिसरातून चारचाकी, दुचाकी गाड्या चोरीच्या अनेक घटना घडत असून याबाबत पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हे गाड्या चोरीचे सत्र सुरू असून शनिवार रोजी रात्री शहरातील अहिल्या नगर येथून पुन्हा एक स्विप्ट कार चोरीची घटना घडली आहे.गेल्या काही दिवसांपासून गेवराई व परिसरात वाहन चोरीच्या घटना सतत घडत असून शनिवार रोजी रात्री पुन्हा शहरातील अहिल्या नगर येथील जि. प. शिक्षक रमेश पवार यांची एम. एच १२ पी. झेड २५८७ या क्रमांकाची स्विप्ट डिझायर कार चोरट्यांनी लंपास केली आहे. दरम्यान सतत घडणाऱ्या या घटणांमुळे शहर व परिसरात भितीचे वातावरण निर्माण
    MH.12 PZ.2587
    झाले असून याबाबत पोलीस प्रशासनही ठोस भूमिका घेत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

    बांगर साहेब, जरा लक्ष घाला

    गेवराई पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर हे गेवराईला रुजू झाल्यापासून त्यांचे मोठ्या प्रमाणावर हार तुरे व पुष्पगुच्छ देऊन विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक सत्कार करत आहेत. परंतु हे सत्कार म्हणजेच त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षांचे ओझं आहे असं समजून त्यांनी आता झपाट्याने कामाला लागले पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले गाड्या चोरीचे सत्र थांबविण्यात त्यांना यश येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून बांगर साहेब आता लक्ष घाला व गाड्या चोरांच्या मुस्क्या आवळा अशी मागणी केली जात आहे.