✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466
उमरखे(दि.20फेब्रुवारी):-शहरातील ए वन फंक्शन हॉल नांदेड रोड येथे नुकताच कपिंग कॅम्प संपन्न झाला या कॅम्पमध्ये तालुक्यातील जवळपास पाचशे लोकांनी फायदा घेतला या कॅम्पमध्ये महिला व पुरुषांनी कपिंग पद्धतीचा अवलंब करून आपल्या रोगावर मात करण्याचा प्रयत्न केला ऍलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी यासारख्या पद्धतीला कंटाळून लोकांनी हा मार्ग अवलंबिला जवळपास एक हजार वर्षांपूर्वीची ही पद्धत आजपर्यंत अमलात आहे.
या पद्धतीचा उपयोग बऱ्याच जुन्या रोगावर मात करण्यासाठी होतो ही पद्धत अतिशय सोपी असून रक्ताद्वारेआपल्या शरीरातील खराब झालेले रक्त कपिंग ने शोषून घेतल्या जाते इस्लाम धर्म मध्ये आपल्या रोगावर मात करण्यासाठी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी या पद्धतीचा मार्ग अवलंबिला आणि त्यांचे साथीदार साहाबीयांनी सुद्धा या पद्धतीचा उपयोग करून बऱ्याच जुना रोगावर विजय मिळविला शरीरातील खराब रक्त ज्यामुळे रोगराई उत्पन्न होते असे रक्त शरीरातून कपिंग द्वारे काढल्या जाते आणि निरोगी होण्यासाठी फार मदत होते म्हणून ही पद्धत संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.
या पद्धतीला विज्ञानाचा सुद्धा आधार असल्याने लोकांना याद्वारे फायदा होतो . याकॅम्पमध्ये परभणी शहरातील विशेषतः डॉ. खिजर, डॉ. सोहेल आणि डॉ. अदनान व अक्सा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष मोईज साहेब सुद्धा उपस्थथित होते तसेच उमरखेड शहरातील पत्रकार बंधू विशेष करून बाळू ओझलवार हे आणि साबिर नाईक (जर्नलिस्ट )सुद्धा उपस्थित होते .आजवर फाउंडेशन नेहमी नागरिकाच्या मदतीला धावून येते कोरोना काळात आपल्या जीवाची परवा ना करता एक एक नागरिकचा जीव कसा वाचेल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले .या काळात गरजूंना राशन किट समशान भूमी मध्ये प्रेतांची अंत्यविधी यासारख्या बऱ्याच सामाजिक कार्य आजवर या संस्थेचे राहिलेले आहे.
यशस्वी होण्याकरिता उमरखेड शहरातील कारी अली, मोहम्मद एजाज, हाफीज अन्सार, मो. तय्यब शेख कलीम, शोएब यांनी परिश्रम घेतले.