‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुरस्कार 2023 जाहीर 

    179
    Advertisements

    ?प्रफुल्ल फडके, महेश पाटील, डॉ. मोहन खडसे, किरण स्वामी, वैशाली चवरे ठरले पुरस्काराचे मानकरी

     ?राज्यातुन चोवीसशे पत्रकारांनी नोंदविला स्पर्धेत सहभाग

    ✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

      मुंबई(दि.20फेब्रुवारी):-पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारे व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड २०२३ ची घोषणा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष विश्वस्त योगेंद्र दोरकर, विश्वस्त प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केली.

     ‘मुंबई चौफेर’चे संपादक प्रफुल्ल रघुवीर फडके यांना प्रथम क्रमांकाचा, साप्ताहिक सुस्वराज्य प्रभात सोलापूरचे संपादक महेश पाटील यांना द्वितीय क्रमांकाचा, तर अकोला येथील स्तंभलेखक, मुक्त पत्रकार डॉ. मोहन खडसे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय प्रोत्साहनपर पुरस्कारांमध्ये सोनपेठ दर्शन परभणीचे संपादक स्वामी किरण रमेश व साप्ताहिक शिवनीती वाशिमच्या जिल्हा प्रतिनिधी वैशाली चवरे यांना प्रोत्साहनपर व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

      व्हॉईस ऑफ मीडिया, राज्य शासन व शेठ ब्रिज मोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्कारांचे नियोजन करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

     व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 च्या प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह सन्मान, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मान. तसेच तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारार्थीला ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर पुरस्कारार्थींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल म्हस्के, विलास बढे, सुधीर चेके पाटील व बालाजी मारगुडे यांनी निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पहिले.

    व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या इतर सोयी-सुविधांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठीदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रातील २० संपादकांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केलेली आहे. देशभरात प्रत्येक तालुक्यात संघटना पोहोचलेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आजवर सुमारे ४० पेक्षा अधिक देशांमध्ये संघटनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सर्व पुरस्कारार्थींचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, राष्ट्रीय संघटक विजय बाविस्कर यांनी अभिनंदन केले आहे. मुंबईमध्ये लवकर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. शेठ ब्रिज मोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे आशीष ब्रिजमोहन लढ्ढा म्हणाले, हा पुरस्कार सेवाभावी कार्य आणि पत्रकारितेचा आदरपूर्वक सन्मान आहे.

    व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख विश्वस्त अनिल म्हस्के, अजितदादा कुंकूलोळ, विजय चोरडिया, अरुण ठोंबरे, दिगंबर महाले, मंगेश खाटीक, संजय पडोळे, चेतन कात्रे, अमर चौंदे, चेतन बंडेवार, भिमेश मुतुला, राज्य कोषाध्यक्ष गजानन देशमुख यांनी या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.