पिण्याच्या पाण्याचा विहिरीचा रस्ता द्या..! (मोहदरी येथील ग्रामस्थांची निवेदनाद्वारे प्रशासनाला मागणी)

184
Advertisements

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 1जुलै) शहराप्रमाणे ग्रामीण भागातही अतिक्रमनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेती, पाणी आणि इतर गोष्टीसाठी जाण्यास गावकर्यांना नाहक त्रास होताना दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहदरी येथील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या डोबाड्या विहिरी चा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून बंद करण्यात आला परंतु ग्रामपंचायत ने जुना आणि मुख्य रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल केल आहे त्या प्रकरणाचा निकाल हा ग्रामपंचायत च्या बाजूने लागला परंतु ग्रामपंचायत ने अतिक्रमण काढण्याच्या अगोदरच समोरील व्यक्तीने जिल्हा सत्र न्यायालय पुसद येथे अपील केली आहे याबाबत 22 जुलै ला पुसद येथे सुनावणी आहे परंतु गवातील लोकांना आता पिण्याच्या पाण्याची गरज आहे.

यावर तोडगा काय निघणार लोकांना हापसी, बोर यांचं पाणी पियाला लगात आहे त्यामुळे लहान बाळासहीत मोठ्या व्यक्तीचे पण आरोग्य धोक्यात आले आहे.
न्यायालयाचा निकाल लवकर लागणार नाही परंतु गावकर्यांची हेळसांड थांबली पाहिजे 21 व्या शतकात पिण्याच्या पाण्यासाठी हक्कासाठी न्याय मागण्याची वेळ आज मोहदरी वासियांवर आली आहे ही शोकांतिका आहे.

यामुळे मोहदरी येथील महिला पुरुष आपल्या मुलाबाळासोबत तहसील कार्यालयावर धडकले.

तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी रस्त्याच्या समस्यावर तात्काळ उपाययोजन करू असे अश्वासन मोहदरी येथील नागरिकांना दिले यावेळी पुंजाबाई खोकले, शंकर डाखोरे, आनंद श्रावणे, सुदाम दांडेगावकर, राजु कांबळे, विठ्ठल पवार, राहुल धुळे, काशिनाथ डाखोरे, दादाराव डाखोरे, अनिल आवटे, बाबुराव सावंगडे, राजु गव्हाणे, गजानन गव्हाने, कुंडलिक गव्हाणे, माधव धुळे, सतीश डाखोरे, शिवराम वाणी, किशोर धुळे, संजय वाणी, शामराव गव्हाणे, शिवाजी गव्हाण, मारोती गव्हाणे, शिवाजी महाजन, भीमराव भालेराव, शोभाबाई सूत्रधार धुळे, कविताबाई हनवते, कांताबाई भालेराव, अनुसया बाई हनवते, मंजुळाबाई कोळेकर, इंदुबाई धुळे, आशाबाई धुळे, सोमीत्राबाई भीमराव गव्हाणे, धोंडाबाई गव्हाणे, शकुंतला बाई मोहिते, सविताबाई गव्हाणे, शेशिकला पवार, विमलबाई पोटे, कोंडाबाई गुवाडे, मंगल कांबळे, पंचांबाई धनगर, जनाबाई राघोजी गाव्हणे, सगुणाबाई आढाव, सुमनबाई वाणी, गिरजाबाई मोरे, बेबीबाई धुळे, राधाबाई कांबळे, गोदावरी बाई धुळे,मारोती गव्हाणे, विनायक गव्हाणे, बालाजी गव्हाणे, प्रकाश गायकवाड, भगवान श्रावणे, पवन गुव्हाडे, मारोती हनवते सोबतच सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे, सरोजताई देशमुख, बबलू जाधव सह शेकडो मोहदरीकर पिण्याच्या पाण्यासाठी तहसील कार्यालय उमरखेड येथे उपस्थित होते.