मोठा माळीवाडा माळी समाज मढी मध्ये गुणवंतांचा गुणगौरव !.. १५० गुणवंतांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव !…

92

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील श्री सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव माळी समाज मढी मध्ये गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. गेल्या ३४ वर्षापासून निरंतर हा कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन. प्रमुख अतिथी म्हणून लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सचिव गोपाल महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, विजय महाजन, सुखदेव महाजन, संजय महाजन, कैलास माळी, कैलास वाघ, उपस्थित होते.
विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, शिक्षणतज्ञ महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर वर्ग १० वी व १२ वीतील ७५ % च्या पुढे, पदवीधर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या अशा जवळजवळ १५० गुणवंत मुला – मुलींचे सन्मानचिन्ह – प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कैलास माळी, संजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले गुणवंतांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी माजी सचिव दशरथ महाजन, संतोष महाजन,प्रा.कविता महाजन,विनायक महाजन, अमोल महाजन, सोनु राजेंद्र महाजन, गोपाल महाजन, पत्रकार रवि महाजन, कालिदास माळी, भास्कर महाजन, गुलाब महाजन, भिका महाजन, दिनेश महाजन, पुना महाजन, निवृत्ती माळी, सागर माळी यासंह शहरातील सर्व माळी समाजातील सर्व सल्लागार पंच व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी तर सल्लागार पंच पी डी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितेश महाजन, चोपदार कैलास माळी यांनी सहकार्य केले.