चौसाळा येथिल साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी कपिल मस्के

151

 

बीड -(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शाहु नगर येथे लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांच्या मार्गदर्नाखाली या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. सर्वानुमते लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतिच्या अध्यक्षपदी शाहु नगर येथिल युवा कार्यकर्ते कपिल मस्के तर उपाध्यक्षपदी रवी सोनवणे तर सचिवपदी लखन सोनवणे यांची निवड करण्यात आली. या बैठकिस चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकणे, एकता ग्रुपचे अध्यक्ष स्वपनील सोनवणे, जितीन काळे, आदेश बोबडे, विकास खोसे पाटील, साहील सोनवणे, विजय क्षीरसागर, कृष्णा चव्हाण, धर्मराज सोनवणे, प्रविण सोनवणे, सचिन सुरवसे पाटील,दादा गायकवाड यांच्यासह अनेक युवक मोठया संख्येने उपस्थित होते.