संस्कार भारतीने केलेला सन्मान हे घरच्यांचे प्रेम : चित्रकार प्रल्हाद ठक

281

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०
चंद्रपूर -श्रध्येय बाबा आमटे यांच्या आनंदवनात नोकरीच्या निमित्ताने रुजू झालो. बाबांनी आनंदवनाच्या माध्यमातून वेदनेशी नाते जोडले. बाबांचा तोच संस्कार मनात रुजला आणि चित्रकार म्हणून मी समाजाशी जोडला गेलो. कलेच्या प्रचार प्रसारासोबत समाजाची सेवा देखील केली. महारांगोळी असो वा स्वरक्ताने काढलेली महापुरुषांची चित्रे असो जेव्हा जेव्हा कौतुक झाले, विक्रमाची नोंद झाली तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीची मला प्रकर्षाने आठवण झाली. संस्कार भारती ने माझा जो सन्मान केला तो माझ्या घरच्या व्यक्तींनी केलेला सन्मान आहे अशी भावना ज्येष्ठ चित्रकार व रांगोळीकार प्रल्हाद ठक यांनी व्यक्त केली.

28 जुलै रोजी संस्कार भारती चंद्रपूर तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरुसन्मान सोहळ्यात प्रल्हाद ठक बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदिनी देवईकर, संस्कार भारतीच्या अध्यक्ष सौ संध्या विरमलवार, जिल्हा मंत्री मंगेश देऊरकर, प्रांत कुटुंब आयाम प्रमुख भावना हस्तक यांची उपस्थिती होती.
कलेचे आराधन करत त्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य करणारी संस्कार भारती आदर्श संघटना आहे. आज जागतिकीकरणाचा काळ आहे. या काळात आपली मूल्य, संस्कार यांची जाणीव समाजाला करून देण्याचे कार्य संस्कार भारती करत असल्याचे नंदिनी देवईकर म्हणाल्या. सोहळयाचे प्रास्ताविक सौ संध्या विरमलवार यांनी केले.यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन प्रल्हाद ठक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन जागृती फाटक यांनी केले. मानपत्राचे लेखन अजय धवने यांनी केले.सौ पूनम झा यांनी नृत्यातून गुरुवंदना सादर केली.यावर्षीची संस्कार भारतीची कार्यकारिणी मंगेश देऊरकर यांनी जाहीर केली.गुरुसन्मान सोहळ्याचे संचालन डॉ राम भारत यांनी तर आभार प्रदर्शन लिलेश बरदाळकर यांनी केले.

पाऊस गीतांचा कार्यक्रम ‘ ऋतू हिरवा ‘

गुरुसन्मान सोहळ्यानंतर ‘ ऋतू हिरवा ‘ हा पाऊस गीतांचा कार्यक्रम संस्कार भारतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सादर केला. प्राजक्ता उपरकर आणि पूनम झा यांच्या विद्यार्थीनींनी पावसावर आधारित नृत्य सादर केलीत. मंगेश देऊरकर, राम भारत, प्रणाली पांडे, भावना हस्तक, जागृती फाटक, क्षमा धर्मपुरिवार,अपर्णा घरोटे,स्वरूपा जोशी, दीपाली पाचपोर, नीता उत्तरवार यांच्या सह अनया भारत, अनिशा भारत, स्वरा बरदाळकर, आनंदी बरदाळकर, सोनाक्षी पिंगे, श्रीश जोशी, माही घुशे, अंतरा बरदाळकर, अन्वी श्रीपूरवार या बाल गायकांनी सहभाग घेतला. निवेदन पूर्वा पुराणिक यांनी केले. संगीत नियोजन प्रवीण ढगे यांनी केले. पियुष राजगडे, सोहन कामतकर,संदीप मंडल,लिलेश बरदाळकर यांनी वादक म्हणून साथ संगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजित आकोटकर, किरण पराते, सुहास दुधलकर यांनी परिश्रम घेतले.