आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा ! मतदार संघातील समस्यांचा निपटारा करण्याचे दिले निर्देश !

54

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघातील खालील विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण विभागांच्या खतेप्रमुखंची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे संपन्न झाली. आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील समस्या तत्काळ निकाली निघाव्या व मतदार संघातील काही विषय तात्काळ सोडविण्यासारख्या असतात परंतू सदर विषय मार्गी लागत नसल्याची नाराजी यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली असून जिल्हास्तरावर मतदार संघातील विवीध विषयाचे अनुषंगाने संबधित सर्व यंत्रणेसह बैठक आयोजित करुन मतदार संघातील विवीध महत्वाचे विषय मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिले.
सदर बैठकीमध्ये मोर्शी विधानसभा मतदार संघातील मोर्शी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मौजे धनोडी ता.वरुड येथे शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामासाठी नविन जागा उपलब्ध करणे, म.ग्रा.रो.यो. अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या विहीरींची नोद ७/१२ वर घेवुन त्यासाठी विद्युत कनेक्शन देणे, राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतक-यांना मिळणा-या अनुदाना मधुन पिक कर्जाची रक्कम कपात न करणे, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम तसेच लेखाशिर्ष २५१५ मधुन मोर्शी विधानसभा मतदार संघात गोडावून बांधकाम करणे,
पि.एम. किसान योजने अंतर्गत तांत्रिक बाबीमुळे शेतकऱ्यांना येणा-या अडचणी सोडविणे, मोर्शी वरुड महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेपर्यंत राष्ट्रिय महामार्ग क्र. ३५३ वरील पुसला जवळील रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करणे,
भाईपुर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करणे, गव्हाणकुंड व डवरगांव ता. वरुड, गणेशपुर ता. मोर्शी जि. अमरावती येथील स्मशान भुमी करीता आवश्यक असलेली जागा उपलब्ध करणे, सिंभोरा व उतखेड ता. मोर्शी येथे वन पर्यटन केंद्र स्थापीत करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करणे, महेंद्री व शेकदरी ता. वरुड येथे जंगल सफारी तयार करणे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेची वरुड व मोर्शी तालुक्यात होणारी अंमलबजावनी चा आढावा, जुनी नगर परिषद, वरुड या इमारती मागील जागा नगर परिषद, वरुड ला हस्तांतरीत करणे, मोर्शी विधानसभा मतदार संघात नव्याने मंजुर झालेल्या प्राथमीक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करणे, मोर्शी विधानसभा मतदार संघातील जल जिवन मिशन योजने अंतर्गत घ्यावयाच्या गावांचा आढावा, महाराष्ट्र जिवन प्राधिकर विभागा अंतर्गत मोर्शी विधानसभामतदार संघातील प्रगतीत असलेल्या कामांचा आढावा, जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान मार्फत घ्यावयाची कामे व मंजुर कामांचा आढावा आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी घेतला असून तत्काळ संपूर्ण विषय मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या यंत्रणेला दिले असून यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, बाळू पाटील कोहळे, बंडू जिचकार, निलेश मगर्दे रामचंद्र राऊत, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.