महसूल सप्ताहा मध्ये सामान्य नागरिकांचे विविध कामे निकाली निघणार

76

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दि ०१ ऑगस्ट) १ ऑगस्ट २०२४ हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात करिता सुरुवात झाली असून आज रोजी महसूल दिन म्हणून उमरखेड तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनात आज पासून महसूल सप्ताह सुरुवात झाला आहे.

आज १ ऑगस्ट २०२४ महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालय उमरखेड येथे महसूल विभागाकडून उमरखेड उपविभागीय अधिकारी माननीय सखाराम मुळे यांचे मार्गदर्शना खाली आज नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका ,इत्यादी वाटप उमरखेड तहसिलदार आर.यु सुरडकर, निवासी नायब तहसिलदार एम. डी. नक्कीतवाड व पुरवठा निरीक्षक एच. डी. गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले असून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.