चिमुर पशु दवाखान्याचे डॉ जांभुळे यांनी केला पशु विम्यात भ्रष्टाचार

    52
    Advertisements

    ?पशु लाभार्थ्यांचे पशु विमा केला हडप

    ?चौकशी करून कारवाई करण्याची जी.प. सदस्य गजानन बुटके यांची मागणी

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि.7ऑगस्ट):-पंचायत समिती अंतर्गत पशु दवाखाना असून या दवाखान्यातून पशु विमा काढल्या जात असून चिमूर येथील मनोहर कामडी यांनी 25 बकऱ्याचा विमा कवच काढण्यात आलेला असताना पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे यांनी सदर बकरी विमा कवच मध्ये अनियमितता करून भ्रष्टाचार केला असून या प्रकाराची तात्काळ कारवाई करण्याची जीप सदस्य गजानन बुटके यांनी केली आहे

    चिमूर येथील मनोहर कामडी यांनी दि 5 आगस्ट 2016 ला पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे कडे 25 बकऱ्याचा विमा काढलेला असताना एका फार्म वर सह्या घेऊन साडेतीन हजार रुपये घेतले होते त्यानंतर बकऱ्यांचे उपचार सुरू असताना दरम्यान तीन महिन्यात बकऱ्या मृत्यू पावले असल्याचे सांगितले तेव्हा फोटो सुद्धा काढन्यात आले सर्व कागद पत्रे लावून पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे दिले परंतु डॉ जांभुळे यांनी नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत लाभार्थ्यांना नाहक त्रास देत होते.

    मनोहर कामडी यांच्या 25 बकऱ्याचा विमा काढलेला असताना फक्त 5 बकऱ्यांचे विमा दिले मग 20 बकऱ्याचे विमा कवच गेले कुठे, 11 महिने झालेले असताना सुद्धा बिल्ले का लावले नाही आदी अनेक प्रश्न निर्माण होते.

    पशु लाभार्थी मनोहर कामडी यांना पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे यांनी वारंवार त्रस्त करीत त्यांच्या बकऱ्यांच्या विमा कवच मध्ये अनियमितता करून भ्रष्ट्राचार केल्याने या प्रकाराची तात्काळ चौकशी करून पशु वैधकीय अधिकारी डॉ जांभुळे वर कारवाई करण्याची मागणी जीप सदस्य गजानन बुटके यांनी केली असून अन्यथा जीप चंद्रपूर समोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.