युवा कार्यकर्त्यांनी वाचविले बालकाचे जीवन

194
Advertisements

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ (दिनांक ६ सप्टेंबर) आई मोबाईल मध्ये गुंग असताना एक सात वर्षीय मुलगा चेतन गजानन उईके गाडीमध्ये बसून यवतमाळ करीत आला हा मुलगा बेपत्ता झाला होता.

याची हे माहित पडल्यास निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे रुग्णसेवक अभिषेक गायकवाड यांनी तात्काळ धाव घेतली.
मुलाचा शोध घेऊन त्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं नाश्ता वगैरे खाऊ घातला आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे त्या मुलाला कायद्याच्या चौकटीत ठेवलं तो मुलगा काही काळानंतर आपल्या परिवारास भेटून फार आनंदित झाला आणि सुखरूप घरी पोहोचला.

सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीस वर्गांनी गुणगौरव केला उपस्थिती अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर साहेब उपनिरीक्षक गणेश शिंदे साहेब व इतर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती अभिषेक गायकवाड निस्वार्थ सेवा फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ता कृतिका मेश्राम सहकार्य उमेश मेश्राम दारूबंदी व्यसनमुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत लांबट, संदीप शिंदे अध्यक्ष नंदादीप फाउंडेशन इत्यादी जण उपस्थित होते.