आम आदमी पार्टीच्या ‘रोजगार’ यात्रेची सुरवात-चिमूर विधानसभा क्षेत्रात बारा गरजू युवक युवतींना रोजगार देऊन तिसरा पर्याय म्हणून आप ची मोर्चेबांधणी

125
Advertisements

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

चिमूर -विधानसभेतील सर्व युवक युवतीशी सवांद साधून त्यांच्या समस्याचा निराकरण करणार असल्याचे प्रा. डॉ. अजय पिसे यांनी सांगितले.

चिमूर विधानसभा ही चिमूर क्रांतीनगरी म्हणून इतिहासात ओळखली जाते देशस्वातंत्र्य झाल्यापासून या भूमीत कांग्रेस आणि भाजपा यांनी राज्य केले मात्र या विधानसभेत रोजगार उपलब्ध करून देण्यात हे दोन्ही पक्ष अपयशी ठरले. सर्वांगीण विकास करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचाच विकास केला, त्यामुळे येथील युवक युवती बेरोजगार असून हाताला काम नसल्याने निराधार झाले असून सुशिक्षित बेरोजगार म्हणून रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत नेमका हाच मुद्दा हेरून आम आदमी पार्टी तर्फे गरजू बारा युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन रोजगार यात्रेची सुरवात केली आहे.

संपुर्ण विधानसभेतील युवक युवतींशी सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल असा मानस आम आदमी पार्टीचे प्रा. डॉ. अजय पिसे यांनी बोलून दाखविला आहे

चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठे उद्योग भांडवल लघुउद्योग गेल्या 60 वर्षात उभारण्यात कांग्रेस तथा भाजपला अपयश आल्याने या क्षेत्रात रोजगार नसल्याने अनेक युवक युवती हे बेरोजगार आहेत. कृषिवर आधारित व्यवसाय नसल्याने शेतकरी सुद्धा कर्जाच्या गळतेत आहेत, शिक्षणाचे योग्य केंद्र नसल्याने योग्य शिक्षण युवकांना मिळत नाही अश्या अनेक समस्यांचे माहेरघर चिमूर विधानसभा क्षेत्र बनला आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या नकारात्मक भूमिकेचा विचार करून तिसरा पर्याय म्हणून जनतेच्या विकासासाठी या क्रांतिभूमीला सर्वच स्तरावर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम आदमी पार्टीने प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतूत्वात आप च्या मोर्चेबांधणी ला सुरवात केली आहे.

या क्षेत्रातील रोजगाराच्या समस्यावर अभ्यास करून अनेक होतकरू युवक- युवतींना रोजगाराच्या समस्येवर प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांना विनंती केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या मदतीने नागपूर येथील कंपनीत ‘फायनान्स अडवायजर’ या जागेसाठी बारा गरजूंची निवड करण्यात आली, त्यांची ट्रेनिंग होऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यात चिमूर विधानसभेतील नागभीड व चिमूर तालुक्यातील युवक युवतींच्या समावेश आहे.

अश्या अनेक गरजू युवक-युवतींची रोजगाराची हि समस्या ओळखून आम आदमी पार्टी तर्फे चिमूर विधानसभेत रोजगार यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. असे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी सांगितले. या यात्रेदरम्यान चिमूर विधानसभेतील सर्व होतकरू युवक- युवतींशी संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आप च्या रोजगार यात्रेला यशस्वी करण्यासाठी आपचे आदित्य पिसे, विलास दिघोरे, प्रवीण चायकाटे, विशाल इंदोरकर, योगेश सोनकुसरे, मुकेश मसराम, शंकरजी रामटेके, विद्याधर मेश्राम, हितेश गेडाम, सुभाष वाघमारे अशे अनेक स्वयंसेवक अविरत प्रयत्न करीत आहेत.