मोटारसायकल च्या धडकेत जब्बर जखमी झालेल्या चा दुर्दैवी मृत्यु

288

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- गंगाखेड येथील होळकर चौकात जलद गतीने धावणाऱ्या मोटारसायकल च्या धडकेत जब्बर जखमी झालेल्या जनार्धन शेप या दूध विक्रेत्याचा बुधवार २५ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी येथील रहिवाशी जनार्धन गणपतराव शेप वय वर्ष४५ नेहमी प्रमाणे २१ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील होळकर चौक च्या परिसरात दूध विक्रीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबलेले असताना *एमएच* *२२ एई ४२५५* क्रमांकाच्या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून जनार्धन गणपतराव शेप यांना जोराची धडक दिली व दुचाकी चालकाने दुचाकी जागीच सोडून फरार झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जनार्धन गणपतराव शेप यांना दामोधर दादाराव भेंडेकर यांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असताना बुधवार रोजी रात्री अंदाजे साडे अकरा वाजेच्या सुमारास जनार्धन गणपतराव शेप यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.