आनंदाचा शिधा वाटप करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

136

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड:-शहर व तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना सप्टेंबर महिन्यात आलेला मोफत रेशन धान्यासहित आनंदाचा शिधा वाटप करावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचांयतच्या वतीने (दि. 27 सप्टेंबर शुक्रवार) रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील गोरगरीब नागरिकांना रेशनचे मोफत धान्यासहित विविध सणावारांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा मोठा गाजा वाजा केला यावेळीही गौरी गणपती उत्सवानिमित्त गोरगरीब नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचेही म्हटले होते परंतु अद्याप पर्यंत सप्टेंबर महिना संपत आला तरी गोरगरीब नागरिकांना त्यांचा हक्काचा आनंदाचा शिधा भेटलेला नाही गौरी गणपती सण संपून दसरा सण यायची वेळ आली तरी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही यामध्ये पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येत असुन स्वस्त धान्य दुकानदारांचा शिधा वाटप न करण्यासाठी प्रशासनावर दबाव तर येतं नाही ना असा आरोप अभा ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आला आहे. गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचा शीधा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाटत करण्यात आला नाही तर दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिनी अखिल भारतीय ग्राहक पंचांयतच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषणही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सोपान टोले, सय्यद ताजुद्दीन, ऍड.उत्तम काळे, गणेश आवके, सुधाकर चव्हाण, प्रभू राठोड, संजीवन कांबळे, कुलदीप मिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत