बदमाश मालक आणि बुद्धीमान नोकर?

147

 

 

 

 

जळगाव मध्ये अशी माणसे खूप आहेत, ते एकांतात किंवा लेखनातून विरोध करतात पण प्रत्यक्षात ते चोरांचा, गुंडांचा अनुनय करतात. चोरांची, गुंडांची तरफदारी करतात. आपला असो कि परका? चूक तो त्यागला पाहिजे. बरोबर तो स्विकारला पाहिजे. पण तसे होतांना दिसत नाही. तसे करीत नाहीत. म्हणून बुद्धिवादी, उच्चशिक्षित, ज्ञानी, प्रामाणिक माणसे निरूत्साही होतात. जे कर्म करीत नाहीत त्यांना फळ दिसत नाही, मिळतही नाही. आनंदही मिळत नाही. ज्ञान खूप असते, विचार खूप चांगले असतात पण त्यांच्या मनात भय असते. म्हणून ते मनातील बोलत नाहीत. पुटपुट करतात. असे पुटपुटणे हा मानसिक पराभव असतो.
जळगाव मधे बुद्धीमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक माणसांची कमी नाही. पण त्यांना आपले विचार प्रयोगात, कृतीत आणायची कधी हिंमत होतच नाही. ते म्हणतात, आम्हाला सुद्धा वाटते, तुमच्या सारखे काहीतरी चांगले करावे, पण आमची थोढी अडचण आहे. आमची मजबुरी आहे. असे कायम अडचणींत असलेली माणसे, मजबुरी सांगणारी माणसे असून नसून सारखेच असतात. जिवंत आणि मृत सारखेच असतात. काल जिवंत होते तेंव्हा काही उपयोग झाला नाही, आज मृत आहेत तरीही काहीच फरक पडत नाही.
मी जळगाव शहरातील अनेक बुद्धीमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक लोकांना भेटतो. आहेत ते. वाटते त्यांना,चांगले घडावे. चांगले करावे. पण ते दैनंदिन जीवनात हिंमत हारलेले दिसतात. म्हणतात ते, तुम्ही बरोबर करतात. मलाही वाटते तसे करावेसे. पण आमची थोडी अडचण आहे.
रावणाने सीतेला पळवून नेले तेंव्हा नाशिक ते रामेश्वरम पर्यंत रामाने अशा लोकांची मदत मागितली होती. पण ते म्हणाले, रावणाने चुकीचे काम केले आहे. पण मी तुम्हाला मदत करू शकत नाही. कारण रावण खूप बलवान आहे. मला त्याची भीती वाटते. काय उपयोग अशा लोकांचा जिवंत किंवा मृत असूनही? शेवटी वानरांना सोबत घेऊन राम लढले. माणसे रामाचे मदतीला आलीच नाहीत. तिच माणसे, त्यांचेच वारस राम गेल्यानंतर रामाचे फोटो, मुर्ती, मंदिर पुजत आहेत.
रामाला माणसांनी का मदत केली नाही? कारण माणसाला घरे दारे जमीन व्यापार लग्न वगैरे करायचे होते. रावण हारला काय किंवा राम हारला काय त्यांना आपली रोटी शेकायची होती. तो प्रश्न, ती अडचण वानरांना नव्हती. म्हणून वानरांनी रामाला मदत केली.
माणसाला कळते, चांगले काय, वाईट काय? पण तो आपल्या स्वार्थापायी ते लपवून ठेवतो. बोलत सुद्धा नाही. करणे तर दूरच.
जळगाव शहरातील अनेक बुद्धिमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक, कुशल लोक दारूवाले, रेतीवाले, डान्सबार विले, चाकू सुरी पिस्तूल वाले, यांच्या खाली काम करतात. हे मोठे आश्चर्य आहे. बदमाष मालक आणि बुद्धीमान नोकर? तर काय उपयोग बुद्धीचा? काय उपयोग शिक्षणाचा? काय उपयोग ज्ञानाचा?काय उपयोग प्रामाणिकपणाचा? काय उपयोग संस्कारांचा?
जळगाव शहरातील अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांशी नाते सांगतात. महाराणा प्रतापसिंहांशी नाते सांगतात. महात्मा ज्योतिबा फुलेंशी नाते सांगतात. पण प्रत्यक्षात त्यांची मैत्री गुंड गुन्हेगारांशी दिसते. ते गुंड, गुन्हेगारांचे अधिन काम करतात. शेखी मारतात. माझे आणि त्या दारूवाल्याशी चांगले संबंध आहेत. माझे त्या रेती वाल्यांशी चांगले संबंध आहेत. माझे त्या डान्सबार मालकाशी चांगले संबंध आहेत. माझे त्या चाकू, सुरी,पिस्तूल चालवणाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. हेच ते लोक, हेच त्यांचे वारस ज्यांनी रावणाच्या विरोधात रामाला मदत केली नव्हती. त्यांचे गणित होते, राम हारला काय किंवा रावण हारला काय? आपल्याला काय फरक पडतो?
मानसशास्त्र सांगते. जे तुम्ही आहेत. ते कृतीतून दिसते. सांगावे लागत नाही. दाखवावे लागत नाही. जे तुम्ही नाहीत ते मात्र सांगावे लागते, दाखवावे लागते. म्हणून कर्मकांड केली जातात. थोतांड केली जातात. शरीराचे डेकोरेशन करावे लागते. असे केल्याने तो आधी समाजाला फसवतो. ईश्वराला फसवतो. स्वताला फसवतो. पण तरीही त्याला समाज आणि ईश्वर चांगलाच ओळखून असतो. आणि तो स्वतः सुद्धा स्वताला चांगलाच ओळखून असतो. असा माणूस समाजात जरी कबुली देत नसला तरीही मंदिरात आणि एकांतात गिल्टी फील करतो. हे गिल्टी फिलींग त्याला मरेपर्यंत छळत असते. ते आत वाळवी सारखे त्याला पोखरत असते. पोकळ बनवते.म्हणूनच तो मंदिर मस्जिद, चर्च गुरूद्वारा वणवण फिरतो. या वाळवीवर इलाज शोधत असतो. जसा, अश्वत्थामा भळभळत्या जखमेवर तेल मागतो. तेल कितीही टाकले तरीही ती जखम भरून निघत नाही.

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
९२७०९६३१२२