रस्त्यासाठी नवीन हातला ग्रामस्थाचा विधानसभा मतदानावर बहिष्कार

25

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक ४ ऑक्टोंबर) पूर परिस्थितीच्या संभाव्य धोक्याखाली असलेले जुने हातला हे गाव शेत सर्वे नंबर 22 ईक्लाश गावठाण या ठिकाणी प्रशासनाने स्थलांतरित करून नवीन हातलावस्ती निर्माण करण्यात आली परंतु गावात ये जा करण्याकरिता रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत तसेच गरोदर माता व रुग्णांना त्याचा अतोनात त्रास होत आहे तेव्हा या रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा ईशारा निवेदनातून जिल्हाधिकारी प्रशासनाला केला आहे यापूर्वीही गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन दिले होते परंतु माजी जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम सर यांच्या मध्यस्थीने आमदार नामदेवराव ससाने यांच्यासह प्रशासनाने सांगितले की आम्ही आपल्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढू तेव्हा मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेत असे आश्वासन देऊनही त्यावर बऱ्याच कालावधी लोटूनही सुद्धा सदर रस्त्याच्या कामाला कुठलीही मंजुरात नाही व त्या कामाला सुरुवात झाली नाही तर रस्त्यासाठी गावकऱ्याची बोळवण करण्यात आली ही शोकांतिकाच आहे त्यामुळे येथील गावकऱ्यांना रस्त्याच्या मागणीसाठी रेंगाळत राहावे लागते त्यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेत इजा करण्यासाठी मोठी कसरत ही करावी लागते तर प्रसुतीकरिता महिलांना व रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी अक्षरशा उचलून न्यावे लागते ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही नवीन हातला येथील गावकऱ्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल‌ तेव्हा प्रशासनाने नवीन हातला येथील गावकऱ्यांचा प्रश्न त्वरित मार्ग काढून कामाला ताबडतोब सुरुवात करावी अन्यथा यापेक्षाही अन्य लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने गावकऱ्यांच्या वतीने उपोषण आंदोलन करून आगामी विधानसभा निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनातून जिल्हाधिकारी प्रशासनाला गावकऱ्यांनी निवेदनातून कळविले आहे.

यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कैलासराव चव्हाण,शंकर शिंदे,विजयराव चव्हाण, विनोद गाडगे, सुदर्शन पाईकराव, कैलास गुंडाप्पा, संतोष राठोड, मंगेश चव्हाण, दीपक बर्डे, प्रदीप गुंडाप्पा,शुभम शिंदे,मनोज बर्डे, करण लोखंडे आदींसह नवीन हातला येथील सर्व गावकरी उपस्थित होते.