आनंदा भारमल यांना महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

102

 

कराड-सातारा :-
जिल्ह्यातील खंडाळा येथील सुप्रसिध्द विद्रोही कवी पत्रकार आनंद भारमल यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सातारा येथील कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र आणि मोकळा श्वास सामाजिक संस्था, सातारा यांच्या कडून अनेक मान्यवर कवी लेखक क्रीडा पत्रकार सांस्कृतिक सामाजिक या क्षेत्रातील मान्यवरांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.
कराड येथे झालेल्या राष्ट्रीय एकता सामाजिक लोक गौरव परिषद कराड-सातारा संमेलनात मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय दर्जेदार साहित्य कृती बद्दल सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या शुभहस्ते व सावली प्रकाशनचे सर्वेसर्वा खरात सर, मोकळा श्वास च्या अध्यक्षा सपना भोसले सौ सारिका आनंदा भारमल सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कवी आनंद भारमल हे पोटापाण्यासाठी सुतार काम(फर्निचर) करतात व छंद म्हणून लेखन सेवा करत आहेत अगदी शालेय जीवनापासून .त्यांच्या कविता सामाजिक विषमता, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची विदारक कहाणी, महिलांचे शोषण, अंधश्रद्धा यावर अतिशय परखड भाष्य करतात.त्यांच्या हजारो कविता, चारोळ्या,कथा फेसबुक व युट्यूबवर प्रसिद्ध आहेत.
पुरस्कार विषयी बोलताना कवी भारमल म्हणाले सामाजिक विषमतेची झळ मी सोसतो त्यातून माझी कविता जन्म घेते व निखाऱ्यासारखी फुलत जाते.हा माझा नव्हे तर माय मराठीचा, माझ्या रसिक जनांचा सन्मान मी समजतो मी संस्थेच्या ऋणात राहू इच्छितो असे प्रतिपादन केले
अशाप्रकारे कौतुक गौरव सोहळा कराड येथील सौ वेणूताई चव्हाण सभागृहात संपन्न झाला.