गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल चे शिक्षक सैय्यद सलमान सरांना ‘उत्कृष्ट शिक्षक 2024’ पुरस्कार मिळाला.

111

 

✒️ सिद्धार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

पुसद :- (दिनांक ६ ऑक्टोबर) ०५ ऑक्टोबर २०२४ शनिवार मुंबई येथे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उर्दू खाजगी शिक्षक संघ तसेच मुंबई मुंसीपल को-ऑरपरेशन यांच्या तर्फे या वर्षी २०२४ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

यात यवतमाळ जिल्हयातील पुसद मधील मा.सैय्यद सलमान सर यांचे उल्लेखनीय शैक्षणीक कार्य अवघ्या महाराष्ट्रात सर्व समाजाच्या मुलांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषे करिता ऑनलाईन व ऑफलाईन विविध उपक्रम तसेच पोलीस भरती सारख्या परीक्षेचे ऑनलाईन मार्गदर्शन तसेच देशात राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी सामाजिक ऐक्य या विषयावर अनेक ठिकाणी संशोधन पेपर व लेख अनेक वृत्तपत्रात मराठीत प्रतुस्त करणे तसेच स्वतः मराठी सारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या विषयात संत साहित्यात सर पि.एच. डी करीत आहे. तसेच प्रेषितांचे चरित्र मराठीत सर्व समाजाला कळावे यासाठी आकाशवाणी केंद्रात मराठीत प्रबोधन तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीत अनेक ठिकाणी व्याख्याने ही सर्व सामजिक आणि शैक्षणिक कामे सैय्यद सलमान सर सुट्टीच्या दिवशी आपला वेळ काढून करीत असतात.

अश्या या त्यांच्या शैक्षणीक कार्यासाठी या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय मुश्ताक अंतुले साहेब चेअरमन महाराष्ट्र राज्य अल्पंख्याक आर्थिक महामंडळ राज्य मंत्री दर्जा यांच्या हस्ते सैय्यद सलमान सरांना २०२४ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.विशेष म्हणजे या पुरस्कारा मध्ये आलेल्या शिक्षकां पैकी सर्वात कमी वय असलेले एकमेव शिक्षक म्हणजे सैय्यद सलमान सर होते.

हा पुरस्कार मिळाल्या नंतर सर्वीकडे आनंद व्यक्त जातो.