ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार:नागभीड-नागपुर मार्गावरील विकली गावा जवळील घटना

203

 

नागभीड-(तालुका प्रतिनिधी) नागभीड-नागपुर या राज्य मार्गावरील बिकली गावाजवळ सोमवारला दुपारी १ वाजता नागभीड कडुन जात असलेला एम.एच.४० वाय.७९७८ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार युवकाला घडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक साहील रवी देवाळे (१८) रा. कानपा असे मृतकाचे नाव आहे. हा युवक काही कामा निमित्त एम. एच. ४० टी ४७९६ या क्रमांकाच्या दुचाकीने नागभीड कडे येत होता. दुपारी १ वाजता नागभीड-नागपुर या मार्गावरील बिकली गावाजवळ ट्रक चालकाने भरधाव वेगाने त्याला सामोरून धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कानपा गावात पोहोचताच गावातील नागरिक घटनास्थळावर गेले. यांची माहिती नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

मृतक साहील देवाळे याला शवविच्छेदनासाठी नागभीड च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने मुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मांढरे करीत आहेत.