वन्यजीव सप्ताहनिमित्य रा. म. गांधी महाविद्यालयाची वनभ्रमंती

80

संजय बागडे तालुका प्रतिनिधी 9689865954नागभीड:-
दि. २ ते ८ ऑक्टोंबर २०२४ चे दरम्यान वन्यजीव सप्ताहनिमित्य वनभ्रमंतीचे आयोजन स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड यांच्या वतीने करण्यात आले. या वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून दि. ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी कसरला अभयारण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी वनभ्रमण केले.
या वनभ्रमंती दरम्यान अरण्यातील विविध प्रकारचे कोळी, किटक व पक्षांची माहिती प्राणीशास्त्र विषयाचे पक्षीतज्ञ डॉ . जी . डी . देशमुख, डॉ. राजेंद्र चव्हाण,डॉ. आर. जे. रुडे व प्रा. कु. नीरा सिंग यांनी दिली. कसरला अभयारण्यातील विविध वनस्पतीच्या प्रजातीची ओळख डॉ. विकास मोहतुरे, डॉ. अंकुश कायरकर व प्रा. धनंजय मडावी यांनी करून दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्याना संबोधतांना डॉ. जी.डी देशमुख यांनी ‘निसर्गामध्ये प्राणी व वनस्पती, अन्नसाखळीमध्ये गुंतलेले असतात त्यात मानवाच्या अमर्याद हस्तक्षेपामुळे विविध प्रजाती नष्टझालेल्या आहेत त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळून त्याची परिणीती मानव व वन्यजीव संघर्षामध्ये होत आहे.’ असे सांगितले.
सदर वन भ्रमंतीत जंगलातील वनस्पती व प्राणी यांच्या सहजीवनाची ओळख विद्यार्थ्यांना झाली व निसर्गाच्या सानिध्यात असतांना कसं वावराव याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. वनभ्रमंतीचे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र , वनस्पतीशास्त्र व नेचर क्लब च्या अंतर्गत करण्यात आले.