आयशर टेम्पो व स्कूल बस यांच्या समोरा समोर जोरात धडक एक जण ठार.

364

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- गंगाखेड शहरापासून सात किलो मीटर अंतरावर दुसलगाव पाटीजवळ आयशर टेम्पो व स्कूल बस यांच्यात जोराची धडक होऊन स्कूल बसचा चालक तथा जय भगवान महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष जनार्दन शेषराव आंधळे राहणार झोला तालुका गंगाखेड येथील रहिवाशी जागीच मृतू पावला. ही घटना शुक्रवार दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली असून परभणी कडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. 04-35 97 व परभणीकडून गंगाखेड कडे येणारी स्कूलबस क्रमांक एम. एच. 44 जी. 2948 यांची समोरा समोर जोराचे धडक होऊन स्कूल बस चालक जनार्दन शेषेराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळतात गंगाखेड पोलीसानी घटनास्थळी भेट दिली. जनार्दन शेषराव आंधळे राहणार झोला येथील रहिवासी असल्यामुळे व जय भगवान महासंघ संघटने जिल्हाध्यक्ष असल्यामुळे या वृत्त कळताच गंगाखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालय मृतांच्या नातेवाईक व गावकऱ्याची मोठी गर्दी केली होती.