चोपडा महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा

28

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, रजिस्ट्रार डी.एम.पाटील, डॉ.आर.आर.पाटील, प्रा. मोतीराम पावरा व ग्रंथालयातील कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की “वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘आजच्या आधुनिक युगात अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण प्रक्रियेत केला पाहिजे जसे की, ई-पुस्तकांचे वाचन, व्हिडीओ पाठ, ई-जर्नल इत्यादी. महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दररोज कमीत कमी दोन तास वाचन करून सांस्कृतिक मूल्यांद्वारे वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करावा. तसेच प्रत्येकाने ग्रंथालयात येऊन डिक्शनरी, विश्वकोश, इन्सायक्लोपेडिया व आपल्या विषयाचे मौलिक संदर्भ ग्रंथ यांचे वाचन करावे, असे आवाहन केले. यांनी ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘ग्रंथालय भेट’ या उपक्रमाचे त्यांनी भाषणातून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ग्रंथपाल डॉ व्ही.आर.कांबळे यांनी केले तर आभार श्रीमती अश्विनी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशीकांत चौधरी, अमोल पवार, कविता वासनिक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनी उपस्थित होते.