डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे वर्षावास समाप्ती निमित्त भोजनदान (शेकडो नागरिकांनी घेतला भोजनाचा स्वाद)

23

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक १६ ऑक्टोंबर) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे मागील तीन महिन्यापासून रोज सायंकाळी ८ वाजता वाचन सुरू होते.

सदर ग्रंथ वाचन आज कोजागिरी पौर्णिमे ला समाप्त करण्यात आले.
या निमित्ताने वर्षावास समाप्ती म्हणून सम्यक बुद्ध विहार येथे सर्वांच्या अन्नदानातून भोजनदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भोजनदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यामध्ये ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रामुख्याने यामध्ये रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

यातील सर्व विजेत्यांना एक वही एक पेन पुष्पगुच्छा देऊन त्यांचा ज्येष्ठ महिला मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच ज्येष्ठ उपसिका जिजाबाई बबन दिवेकर यांच्याकडून सुद्धा एक वही, एक पेन तसेच गवंदे परिवार यांच्याकडून सुद्धा एक मेडल देऊन स्पर्धेतील विजेत्या प्रत्येकांना गौरवण्यात आले.

तर मागील तीन महिन्यापासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन उपासिका सोनाली सतीश इंगोले यांनी केल्यामुळे त्यांचा साडी,पंचशील शाल व पुष्पगुच्छ देऊन रमामाता महिला मंडळाकडून सत्कार करण्यात आला.

तसेच भदंत कीर्तीबोधी यांना चिवरदान,फळ दान, धम्मदान देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड यांनी केले होते.

शेकडो नागरिकांनी वर्षावास समाप्ती निमित्त च्या भोजनदानाचा स्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समिती तथा रमामाता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला होता.

यावेळी भदंत कीर्ती बोधी,हिराबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, आनंदबाई दिवेकर, उषाताई इंगोले (अध्यक्ष), भारतीय केंद्रेकर (उपाध्यक्ष), कांचन दिवेकर, उज्वला धबाले (सचिव), मधुबाला दिवेकर, विद्या इंगोले, बेबाबाई गवंदे,सुनीता दिवेकर, राखी धबाले (कोषाध्यक्ष), स्वाती दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, रंजना आठवले (संघटक), गौतम दिवेकर,तुषार पाईकराव, संतोष इंगोले,मनोज इंगोले, प्रफुल दिवेकर, कुणाल श्रवले, नितीन आठवले,आकाश श्रवले इत्यादींनी खूप परिश्रम घेतले.