संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – अण्णासाहेब कटारे

15

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला नाशिक येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्ताने मुक्तीभुमी पटांगण येवला येथे
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते सभेस उपस्थित होते.
सदर सभेस मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येयधोरणे राबविले जात आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून देशाचा कारभार करण्याचे आश्वासन भारतीयांना देण्यात आलं होतं.परंतु त्याच संविधानाची अवहेलना होण्याचे प्रसंग वाढत आहेत, परिणामी *देशातील मागास दलित,आदिवासी,ओ.बी.सी.मुस्लिम अल्पसंख्यांक,भटके विमुक्त आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान खालवत जात असून मूठभर साम्राज्यवादी लोकांची सत्ता प्रस्थापित होत आहे.
अशा परिस्थितीत देशात पुन्हा एकदा संविधानाचे सन्मानाचे समतेचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी *संविधानवादी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची व पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांची आहे.*
देशात व राज्यात धर्मनिरपेक्षवादी पक्षांची वाताहात होत असतांना धर्मांधशक्ती सत्तेच्या बळावर साम्राज्यवाद प्रस्थापित करू पाहत आहे याला केवळ थोपवून नव्हे तर नेस्तानाबूत करण्याचे सामर्थ्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या आंबेडकरी विचारधारेतच असून, आजमितिस,शोषित,पीडित, असलेला समाज संघटित होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता त्याला नेत्यांमधील हेव्यादाव्यांमुळे खिळ बसू नये आणि रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा जोमाने उभी करून संघटित शक्ती उदयास यावी,अशी आशा यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी व्यक्त केली.
संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले.
जाहीर सभेस
प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे,मराठवाडा अध्यक्ष संतोषजी मोकळे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील जगताप,युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपीन कटारे,मुंबई प्रदेश सचिन नांगरे, माजी न्यायमूर्ती एडवोकेट जयप्रकाश घोरपडे, दर्शन कुमार इंगळे, संदीप गांगुर्डे,संदीप गायकवाड,हितेश भालेराव, कांतीलाल बनसोडे, मनोहर दोंदे,शिवाजी गायकवाड, संदीप बनसोडे,गीताराम घोडेराव, गणेश अहिरे,सुभाष सिकलकर, कृष्णा त्रिभुवन,वाल्मिक खरात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन येवला युवा नेते तुषार वाघ, बबन वाघ यांनी केले होते