निवडणूकीचे प्रशिक्षण 28 आक्टोबर पूर्वी किवा 12 नोव्हेबर नंतर घेण्याची महा. पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

49

 

चंद्रपूर -केद्र व राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचे कार्यक्रम घोषीत केले असून महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक दिनांक २० नोव्हेंबर २०२४ घेण्याचे घोषीत केले आहे. त्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेचे स्वरुप व पध्दत समजावून सांगण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन टप्यात प्रशिक्षण होणार आहे.
मात्र जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना दिनांक २८/१०/२०२४ ते ११/११/२०२४ पर्यंत दिवाळीच्या सुटटया आहेत. दिवाळी हा हिंदुचा अतिशय महत्वाचा सण आहे. या सणासाठी प्राथमिक शिक्षक बाहेरगावी जात असतात तसेच चंद्रपूर जिल्हयात काही प्राथमिक शिक्षक हे बाहेरील जिल्हयातील सुदधा आहेत. सणासाठी प्राथमिक शिक्षक स्वगावी जातात त्त्यामुळे अशा महत्वाच्या सणासुदीच्या काळात प्रशिक्षण ठेवणे म्हणजे संबंधित शिक्षकांना हिंदुंच्या सणापासून वंचित ठेवण्याचा अन्यायकारक व अशोभनीय प्रकार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता निवडणूक संबंधीचे पहिले प्रशिक्षण दिनांक २८/१०/२०२४ पूर्वी आणि दुसरे प्रशिक्षण १२/११/२०२४ नंतर घेण्यात यावे अशी संघटनात्मक विनंतीवजा मागणी पुरोगामी शिक्षक सघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अल्का ठाकरे, दिपक व-हेकर, नारायण काबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनदवार, सुरेश गिलोरकर, गगाधर बोढे, सुनिल कोहपरे, दिवाकर वाघे, जीवन भोयर, सुभाष अडवे, सुनिता इटनकर,शालिनी खटी, पौर्णिमा मेहरकुरे, लता मडावी, सुलक्षणा गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली असल्याचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे.