गदगांव (चिमूर) येथील अतिक्रमण हटविणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या भावनेचा अनादर…

228
Advertisements

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके

📱9890940507

प्रतिनिधी : चिमुर तालुक्यातील येथुन जवळच असलेल्या गदगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आल्याने म्हणजे अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनेचा अनादर करण्यात आल्याचे समाजात तिव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत

जमीन महसुल अधिनियम १९६६ चा कलम ५१ नुसार मौजा गदगांव येथील प्लॉट नंबर २८.०८ आर इतकी जागा नियमाकुल करण्यासाठी चिमूर तालुक्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना निवेदन दिले. तद्वतच सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात येणार आहेत. याचबरोबर चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांनाही सदर आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

चिमूर तालुक्यातील मौजा गदगांव
बौध्द कमिटी महिला अध्यक्ष चंदाबाई प्रभुजी गेडाम व इतर यांनी आबादी मधील खाली जागा क्षेत्र प्लॉट २८.०८ आर इतकी जागेवर मागील १५ वर्षापासून ताबा वहिवाटीत असून, त्या जागेवर विविध महापुरूषांचे कार्यक्रम आम्ही राबवीत असतात. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो बुध्द जयंती असो,महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो विविध महापुरूषांचे जयंती व सार्वजनिक कार्यक्रम त्या जागेवर गदगाव येथील बौद्ध नागरिक व महिला भगिनी घेत असतात.

सदरची जागा मालकी हक्काने करण्याबाबत मौजा गदगांव येथील बौद्ध पंचकमेटीच्या अध्यक्षांनी महसुल अधिकारी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र आजपर्यंत सदरची
जागा अर्जदाराच्या व बौद्ध पंचकमेटीच्या नावाने नियमानुकूल केलेले नाही.

बौध्द समाजातर्फे त्या ठिकाणी १ हजार २० फुटाची टेन्ट उभे केले असुन पंचशील ध्वज सुध्दा उभा केला आहे. त्या ठिकाणी तथागत गौतम बुध्दांची मूर्ती सुध्दा, ( १.५ फुट उंच मूर्ती) तीन फुट उंचीच्या सिमेंटच्या चबुत-यावर बसविली असून अंदाजे ७ हजार ९५६ फुट मध्ये अतिक्रमण केलेले आहे. ती जागा मौजा गदगांव येथील बौध्दांचे श्रध्दास्थान आस्थेचे ठिकाण आहे.

गदगांव या गावांमध्ये अनेक मंदिरे, हनुमान मंदिर, मॉ माणिका देवी मंदीर आदीसह इतर मंदिरे अतिक्रमीत जागेवर गावात बसविले आहेत.

त्याच प्रमाणे बौध्दांच्या आस्थेसाठी सदर अतिक्रमण जागे ठिकाणी मागील अनेक वर्षापासुन लोकहितासाठी सार्वजनिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत.

बौध्द धम्म हा शांतीचा
असल्यामुळे आम्ही कुठलीही शांतता भंग आजपर्यंत गावात केलेली नाही असे मौजा गदगांव येथील बौद्ध समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे.

निवेदनात म्हटले आहे की,मौजा गदगांव येथील बुध्दांच्या आस्थांचे ठिकाण हटविण्यापूर्वी गावातील अतिक्रमण जागेतील सर्व मंदिरे सुध्दा हटविण्यात यावे.
तरच आमच्या बुध्दांचे पंचशील ध्वज हटविण्यात यावे,चिमूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख अधिनियम १९६६ वा कलम ५१ नुसार सदरची जमीन नियमानुकूल करून आदेश पारित करावा व २९/११/२०२४ रोजी काढलेला आदेश तात्काळ खारीज करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.