सातारा जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने ई व्ही एम विरोधात स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात : पृथ्वीराज चव्हाण

24
Advertisements

*सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा. 9075686100*

म्हसवड /सातारा : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका अथवा लोकसभा, विधानसभा या सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका सरकारने घ्याव्या यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथील काँग्रेस कमिटी येथे पदाधिकाऱ्यांसमवेत स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात केली.

सरकारला धारेवर धरण्यासाठी रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार असल्याचे सातारा येतील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. निकाला बाबत आम्ही आत्मपरीक्षण करू पण मारकडवाडी मध्ये जी दडपशाही केली जाते आहे ती ब्रिटिश काळापेक्षा देखील वाईट असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मारकटवाडी मध्ये ग्रामसभा घेणे हे नागरिक म्हणून त्याचा अधिकार आहे. पारदर्शक निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम होते. पण जर एका व्यक्तीचा विश्वास नसेल तर त्याची दाखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. माझा अधिकार निवडणूक आयोग दडपू शकत नाही. माझ्यावर आणि शरद पवारांवर कारवाई करतो म्हणाले ही ब्रिटिश काळा पेक्षा मोठी हुकूमशाही असल्याचं चव्हाण यांनी सांगितले. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा खटला असणाऱ्या पक्षांतर बंदी कायद्याबाबत निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड सिंग यांना लोकशाही बळकट करण्याची संधी होती. मात्र त्यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रचूड यांच्यावरती केली.

त्यामुळे बेकायदेशीर सरकार दोन अडीच वर्ष चालवलं गेलं त्याला कोण जबाबदार असा प्रश्न देखील चव्हाण यांनी उपस्थित केलाय. याविषयी ईव्हीएम मशीन बाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन मागण्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय जुरी समोर काही मशीन देऊन त्या तपासल्या जाव्यात त्याचबरोबर १००% चिठ्ठ्या या मोजल्या जाव्यात अशा दोन मागण्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहेत.