Advertisements
✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986
ब्रम्हपुरी (३१):- चंद्रपूर जिल्ह्यातील वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठी वसलेले सर्व गावांना गोसेखुर्द पाणी, संजय डॅम च्या पाण्याने हाहाकार माजविला आहे.जिथे जागा मिळेल तिथे आपले वास्तव्य ठोकून असलेल्या लोकांना आज त्यांना मदतीची गरज आहे.
अश्या प्रतीक्षेत बसलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव वासियांना ब्रम्हपुरीचे एस. डी. ओ. क्रांती डोंबे मॅडम यांच्या अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात आला.काही का होईना लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तरी पण समोरची गरज लक्षात घेता. तातडीने खाण्यापिण्यची लागणाऱ्या वस्तू ची मदत करावी.अशी गावकरी मंडळींची विनंती आहे.