दलित, मुळनिवासी संकल्पना आणि भारतीय संविधान

    55
    Advertisements

    भारतीय समाज व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर असे दिसून येते की,ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र अशी चार वर्ण आहेत….म्हणजेच,जे ब्राम्हण,क्षत्रिय किवा वैश्य नाहीत ते सर्व शूद्र असा त्याचा अर्थ निघतो.
    अडिच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांचा या भारत भुमिवर जन्म झाला. त्यांनी मानवतावादी,विज्ञानवादी विचार अंगिकारले आणि “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे तत्वज्ञान भारतीय समाज व्यवस्थेत नव्हे तर संपूर्ण विश्वात पसरविले.
    भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञानातील बहुजन या शब्दाचा अर्थ बहुसंख्येशी संबंधित आहे ना की जात,धर्म अथवा पंथ वगैरे.
    परंतु भारतीय संविधान 26-1-1950 ला लागू झाल्यानंतर कुटनितीचा अवलंब करून सामाजिक, राजनितीक लोकांनी आणि मिडियावाल्यांनी दलित, मुळनिवासी असे भेदभाव दर्शविणारे आणि गुमराह करणारे शब्द भारतीय समाज व्यवस्थेत जाणूनबूजून पसरविले.
    भारतीय संविधानात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटके जमाती, इतर मागासवर्गीय जाती ( ओबीसी ) असा समुदाय नमूद केलेला आहे. हा संपूर्ण समुदाय भारतात जवळपास ढोबळमानाने 80% चे वर आहे आणि या संपूर्ण समुदायात हजारो जाती,जमाती आहेत.
    म्हणजेच,भारतीय संविधानाने दलित, मुळनिवासी हा समुदाय नाकारलेला आहे तेव्हा सामाजिक,राजकीय लोक आणि मिडियावाले दलित,मुळनिवासी हे शब्द कोणत्या समुदायातील लोकांसाठी वापरत आहेत हे समजणे अवघड आहे.
    विशेष म्हणजे, बरीच उच्च शिक्षित,साहित्यिक सुध्दा स्वताला दलित,मुळनिवासी समजतात.
    “मै दलित की बेटी हू, मै मुलनिवासी हू” असे शब्द आजकाल उच्च शिक्षित लोकांचे तोंडातून बाहेर पडतांना दिसतात.
    सर्व भारतीय लोकांनी संविधानातील शब्दांचाच वापर करायला पाहिजे जसे; मी अनुसूचित जाती मधील आहे, मी अनुसूचित जमाती मधील आहे, मी विमुक्त भटके जमाती मधील आहे, मी ओबीसी आहे, मी मुस्लिम आहे, मी बौद्ध आहे, मी जैन आहे,मी पारसी आहे, मी ब्राम्हण आहे वगैरे वगैरे हे शब्द संविधानिक आहेत आणि त्याचा कायदेशीर अर्थबोध होतो आणि जे समाज व्यवस्थेत आहे ते पारदर्शक सांगीतले पाहिजे.
    परंतु, दलित, मुळनिवासी हा कोणता समुदाय आहे आणि हे शब्द समाज व्यवस्थेत भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर म्हणजे 26-1-1950 नंतर कोणत्या कटकारस्थानाने वापरल्या जात आहेत याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे.

                                   ✒️लेखक:-अँड. शंकरराव सागोरे
                                                   प्रोफेसर काॅलनी, चंद्रपुर
                                                   मो:-7875762020

    ▪️संकलन
    नवनाथ पौळ
    केज तालुका प्रतिनिधी
    मो:-8080942185