गुरुर ब्रम्हा,गुरुरविष्णू गुरुरदेवो महेश्र्वरा:।
गुरू साक्षात परब्रम्ह तस्माई:श्री गुरुवे :नमः।
पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन.ज्यांनी आपल्याला शाळेत मार्गदर्शन केले,त्या गुरुजनांच्या कार्याचा गौरवाचा हा दिवस होय.खरे पाहता 5 सप्टेंबर म्हणजे भारताचे माजी कै.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.ते आधी शिक्षक होते. त्यांना शिक्षकी जीवन फार आवडायचं.हे कार्य इतरांच्या तुलनेत वेगळे आहे.शिक्षक भावी पिढी घडविणारा शिल्पकार आहे.हे ओळखून त्यांनी आपला वाढदिवस म्हणजे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करावा असे सांगितले.तेव्हा पासून हा दिवस 5 सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
खरोखरच शिक्षक हा भावी पिढी घडविणारा शिल्पकार आहे.केवळ तो ज्ञान दान करीत नाही,तर त्याच्यावर सुसंस्कार करतो. त्याच्या समोर विविध आदर्श ठेवून त्यांच्या मनाची जडण-घडण करतो.त्यांना सत्प्रवृत्त बनवितो.शिक्षक खरा मार्गदर्शन असतो.
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळेचभविष्यातलेइंजिनिअर,लेखक,शिक्षक,न्यायाधीश,या अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचविणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनन्तर शिक्षकांकडून खूप खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाते.म्हणून शिक्षकांना दुसरे पालक म्हणतात.मत ,विचार व व्यक्तिमत्त्व घडविण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो.चांगले दर्जेदार शिक्षण देेवून जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते.या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी व शिक्षकांप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पूर्वी पासून गुरुची महिमा फार गाइली जाते.पूर्वी गुरू वनात राहत.त्यांचे आश्रम असत.तेथे ते चिंतन करीत.मुले त्यांच्या हाताखाली शिकण्यासाठी गुरूच्या आश्रमात पाठवीत असत. विध्यार्थी आश्रमात राहून सर्वकामे करून विद्या संपादन करीत.गुरू शिष्यांची आदराचे स्थान होते.गुरूने सांगितलेली गोष्ट कितीही अवघड ,कठीण असली तरी पराक्रम व परिश्रमाची शर्थ करून ती गोष्ट करीत.अशा अनेक गोष्टी पुर्वीच्या काळच्या सांगितल्या जातात.
अरूंनी गुरूच्या सांगल्या वरून बाधाऱ्याचे पाणी अडवायला गेला.दगड -धोंडे-माती-वाळू यांचा काही उपयोग होईना म्हणून पाण्यात स्वतःच आडवा झाला व पाणी अडविले असे अनेक उदाहरणे देता येईल.गुरुमहिमा संबंधी पुराण काळात अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
गुरू गोविंद दोऊ खडे,काके लागू पांय।
बलिहारी गुरू आपने गोविंद दियो बताय।
आधुनिक युगातीळ महान आचार्य-डॉ .राधाकृष्ण:
मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या व्यक्तीतीत डॉ राधाकृष्ण यांची गणना होते.जीवनभर अध्ययन अध्यापनाचे कार्य केले.राजकारणापासून अलिप्त राहिले.आशा महान ऋषी तुल्य व्यक्तीचा भारताने उपराष्ट्रपती व राष्ट्रपती पद देऊन गौरव केला.एक शिक्षकाचा केवढा मोठा बहुमान केला!
असे महान कार्य करणाऱ्या सर्व गुरू बद्दल, त्यांनि केलेल्या कार्याबद्दल शिक्षकांप्रति आभार व्यक्त करण्याचा हा दिवस होय.
‘गुरू देतील जगाला आदर्श वसा
घडवतील नागरिक सबल करण भरता’
✒️लेखिका:-सिंधू महेंद्र मोटघरे पदवीधर शिक्षिका
निर्मल टॉकीजच्या मागे शास्त्रीवार्ड गोंदिया.
मो:-9404306224