भाजपा जिल्हा व तालुका व कार्यकारणीमध्ये घनसावंगी विधानसभा मतदार संघातील निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मतदारसंघात भाजपाचे संघटन वाढवावे – माजी आमदार विलास बापु खरात

    55
    Advertisements

    ✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

    जालना(दि.5सप्टेंबर):-भारतीय जनता पार्टीची घनसावंगी तालुका कार्यकारणी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे पाटील यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष मा आमदार संतोष दानवे यांच्या मान्यतेनुसार व केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब पाटील दानवे, मा.आमदार विलास बापू खरात आ.नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. 04/09/2020 रोजी अंबड येथील विलास बापू खरात यांच्या निवासस्थानी जाहीर केली आहे.

    या कार्यकारणीमध्ये एकुण 7उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 5चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, कार्यालयीन प्रमुख, व शोशल मिडिया प्रमुख .प्रसिध्दीप्रमुख यांच्यासह 61 कार्यकारणी सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 6 युवा मोर्चा, किसान मोर्चा,अनुसूचित जाती जमाती मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, ओबीसी मोर्चा, सर्व आघाडी सेल त्यामध्ये सर्वांची निवड नियुक्ती करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारसरणी व ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत  पोहचवुन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील, मा.सौ.पंकजाताई मुंडे, आ.गोपिचंद पडळकर यांचे हात मजबुत करण्यासाठी खांदयाला खांदा लावुन पक्षाचे संघटन वाढवावे असे आवाहन माजी आमदार विलास बापू खरात यांनी केले आहे.

    तसेच जिल्हा कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे व तालुका कार्यकारणी मध्ये नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे मा.विलास बापू खरात यांनी सर्व नुतन पदाधिकारी व सदस्यांचे सत्कार अभिनंदन केले आहे. यावेळी कार्यकारणी व पदाधिकारी उपस्थित होते.