चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या (दि.14सप्टेंबर) 24 तासात 200 कोरोना बाधित – सात कोरोना बाधितांचा मृत्यू

    60
    Advertisements

    ?कोरोना बाधितांची एकूण संख्या 6058

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.14सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 200 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 58 झाली आहे. यापैकी 3 हजार 405 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 575 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

    24 तासात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.यामध्ये बालाजी मंदीर परिसर चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    दुसरा मृत्यू शंकरपूर चिमुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 12 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब व मधूमेह होता.

    तिसरा मृत्यू बाबुपेठ चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    चवथा मृत्यू बल्लारपूर येथील 32वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    पाचवा मृत्यु वाघोली ता. सावली येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    सहावा मृत्यू बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    तर, सातवा मृत्यू भीवापूर वार्ड चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

    जिल्हयात आतापर्यंत 78 बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्हयातील 71, तेलंगाना एक, बुलडाणा एक,गडचिरोली दोन, आणि यवतमाळ तिन बाधितांचा समावेश आहे.

    जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 139, कोरपना तालुक्यातील 5, नागभीड तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 14, भद्रावती तालुक्यातील 8, मूल तालुक्यातील 10, राजुरा तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 2, सिंदेवाही तालुक्यातील 8, गडचिरोली येथील एक असे एकूण 200 बाधित पुढे आले आहे.

    या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:-

    चंद्रपूर शहरातील दक्षता नगर, लक्ष्मी नगर तुकुम, जटपुरा गेट परिसर, नगीना बाग, बाजार वार्ड, सिंधी कॉलनी रामनगर, घुटकाळा वार्ड, भानापेठ वार्ड, भिवापूर वार्ड, दत्तनगर, गंज वार्ड, बेलवाडी, शास्त्रीनगर, रयतवारी काॅलरी परिसर, श्याम नगर,भागातून बाधित पुढे आले आहे.

    तालुक्‍यातील या ठिकाणी आढळले बाधित:-

    बल्लारपूर तालुक्यातील बुद्ध नगर वार्ड, विद्यानगर वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, गणपती वार्ड, गांधी वार्ड, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मूल तालुक्यातील चिंचाळा, मुल वार्ड नं. 7, वार्ड नं.8, वार्ड नं.15 भागातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील देशपांडे वाडी परिसर, चुनाळा, भारत चौक भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील शास्त्रीनगर आवारपूर, शिवाजी नगर वॉर्ड नं.5 नांदाफाटा, ज्योती नगर, समर्थ नगर, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.