ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाहीच्या सौंदर्यीकरणात आता आणखी भर

    55
    Advertisements

    ?मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये 8 कोटी 50 लाखांच्या विकासकामांना मंजुरी

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रह्मपुरी(दि.17सप्टेंबर):-नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नागरपरिषदेच्या एकूण 8 कोटी 50 लाखांच्या विकासकामांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण विकास, खार जमीन विकास व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 16 सप्टेंबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे.

    श्री. वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरवठा केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे उद्यान सुशोभीकरणासाठी 3 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून ब्रम्हपुरी नगरपरिषद इमारतीपुढील पुतळा सुशोभीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. असा एकूण 4 कोटी 50 लाख रुपये इतका निधी ब्रम्हपुरीसाठी मंजूर झाला आहे. तर सावली येथे रमाई सभागृह बांधकाम इत्यादीसाठी 2 कोटी निधी मंजूर झाला असून सिंदेवाही येथे उद्यान सुशोभीकरणासाठी 2 कोटी निधीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

    श्री. वडेट्टीवार यांनी या विषयाचा प्रभावी पाठपुरावा करून त्यात यश प्राप्त केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नागरपरिषदेतील विकासकामांना एकूण 8 कोटी 50 लाख रुपये इतका निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नगरपरिषदेच्या सौंदर्यीकरणात आणखी भर घातली जाणार आहे.