?जवळपास ४ लाख ७५ हजार रुपयांनी फसवणूक झालेल्या बचत गटाच्या महिलांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली तक्रार
✒️नरेश निकुरे(कार्य. संपादक)मो:-9823594805
चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):-दुर्गा महिला बचत गट अध्यक्षा हर्षा ठाकरे ह्या महिलांनी आपल्या सहकारी बचत गटातील सदस्य महिलांचे गुंतवलेले जवळपास ४ लाख ७५ हजार रुपये परस्पर बैंक मधून काढून गुंतवणूकदार महिलांची फसवणूक केल्याने आपल्या हक्कासाठी त्या महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
सन २०१० ते २०१६ पर्यंत दुर्गा महिला बचत गटाच्या महिलांनी अध्यक्षा हर्षा ठाकरे यांच्याकडे महिलांनी दरमहा २०० रुपये पाच वर्ष जमा केले व पाच वर्षांनंतर जेव्हा जमा रक्कम व्याजासह देण्याची वेळ आली तेव्हा हर्षा ठाकरे हिने पैसे मागणाऱ्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे, त्यामुळे दुर्गा महिला बचत गटाच्या महिलांनी वरोरा पोलिस स्टेशन मधे अनेक तक्रारी केल्या पण तूम्हचे पैसे मी काढून देतो वेळ आल्यास आरोपी चे घर जप्त करून त्या पैशातून तूम्हचे पैसे काढून देवू असे आश्वासन ठाणेदार उमेश पाटील यांनी महिलांना दिले होते पण नंतर केवळ कलम 406 अंतर्गत गुन्हा दाखल करून महिलांच्या पैसे मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले.
त्यामुळे आता वरोरा पोलिस स्टेशन मधे न्याय मिळत नाही म्हणून त्या सर्व महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली व तिथे तक्रार देवून दुर्गा महिला बचत गटाच्या अध्यक्षा हर्षा ठाकरे यांच्यावर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करावा व दोषी आरोपी हर्षा ठाकरे ह्या महिलेला अटक करावी अशी मागणी चंद्रपूर डिजिटल मिडिया असोसिएशन कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे. याप्रसंगी दुर्गा महिला बचत गटाच्या सदस्या नंदा आसुटकर, तारा मत्ते, लीला क्षीरसागर, सुमित्रा बावने व श्रीमती अर्चना सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.