कोरोना काळात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी वंचीत

    138
    Advertisements

    ?नागभीड तहसील कार्यालयातील प्रकार

    ?आझाद युवा संघटनेचे अध्यक्ष निकेश रामटेके यांनी प्रशासनाला दिला ईशारा

    ✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागभीड(दि.19सप्टेंबर):-तहसील कार्यालया अंतर्गत श्रावन बाळ योजना आणी संजय गांधी नीराधार योजना या योजनेचा लाभ घेनारे लाभार्थी अनेक महीन्यापासुन वंचीत असल्यामुळे त्यांच्यावर आर्थीक संकट कोसळले आहे. कोरोनाच्या काळात रोजगार नसल्यामुळे. व खेडेगावात कोरोनाच्याच काळात अवाढव्य माहागाई वाढल्यामुळे गरीब व व्रृद्ध लोकांना मोठ्या प्रमानात आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. वारंवार ती व्रृद्ध लोकं बँकेत जावुन चौकशी करायचे. चौकशी दरम्यान त्यांना तहसीलला जाउन चौकशी करायला सांगीतल्या जात होतं. तीथ गेल्यावरही सबंधीत अधीकारी कधी व्यवस्थीत सांगायचे तर काही उडवा उडव करुन हाकलुन लावायचे. कोरोनाच्या भीतीने कर्मचारी त्यांना जवळ येवु देत नाही.

    वारंवार त्रास सहन करनारा हा व्रृद्ध मानुस हताश झालेला आहे. त्यांचा नीधी त्यांना आठ दीवसाच्या आत देन्यात यावा. पुन्हा व्रृद्धांना याच प्रकारचा त्रास सहन करावा लागला तर तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला. आंदोलनात झालेल्या अनुचीत प्रकाराला प्रशासनच जवाबदार राहील. असा ईशारा देत आझाद युवा संघटनाचे अध्यक्ष निकेश रामटेके यांच्या वतीने तहसील कार्यलय नागभिडचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जील्हाधीकारी जील्हा कार्यालय चंद्रपुर यांना देन्यात आला.