आंबोली – आसोला मार्गावर खड्ड्यांमध्ये बेसरमची झाडे लावुन आंबोली-आसोला गावकऱ्यांकडून शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात आंदोलन

    61
    Advertisements

    ?पोलीस सहाय्यक निरीक्षकांमार्फत निवेदन सादर

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि.19सप्टेंबर):-आंबोली-आसोला मार्गावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हे खड्डे शेतकऱ्यानां व शेतमजुरांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघातास आमंत्रण देत आहे व मागील महिनाभरापासून या ठिकाणी अनेक अपघातही झालेले आहेत व अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या त्या ठिकाणी फसलेल्या आहेत व या मार्गाने असोला , आंबोली चिंचाळा , लावारी ,बोरगाव वाकर्ला, येने जाणे करीत असतात , या खड्यांवर उपाययोजना करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर यांना निवेदनाच्या माध्यमातून कळविले होते व तीन दिवसांची मुदत देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही व त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

    सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वामध्ये आंबोली- आसोला मार्गावर खड्यांमध्ये बेशरम (मैदीच्या) झाडे लावून आंदोलन करण्यात आले व पोलीस सहाय्यक निरीक्षक पोलीस दुरक्षेत्र शंकरपूर यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर व सार्वजनिक बांधकाम विभाग चिमुर यांना निवेदन पाठविण्यात आले व हे आंदोलन शांततेमध्ये phygical distansing चा वापर करून व मास्क चा वापर करूनआंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन करतांना सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे उपस्तीत होते.

    व परिसरातील शेतकरी , सुरेश गरमडे , कांशीरामजी चौरे , मधूकरजी नागपुरे , मुरलीधरजी चुनारकर ,सुधाकरजी राऊत चिंचाळा , नंदू ठाकरे , पंकज चन्ने असोला , निकेश खंडसंग आसोला , विजय माथने ,प्रमोद भषारकर ,राकेश गायकवाड , संजय लाकडे ,भोजराज गायकवाड ,वसंता चौरे उपस्तीत होते.