सामाजिक कार्यकर्त्या अॅड,पुनम किशनराव पांचाळ लातूरकर यांना कोवीड-१९ योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान

    55
    Advertisements

    ?कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.२०सप्टेंबर):-कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असताना याच लाॅकडाऊच्या काळात कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महिला आघाडी च्या अध्यक्षा पुनम किशनराव पांचाळ लातुकर यांनी कोरोना व्हायरस कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात मानवतेच्या दृष्टीने आपले कर्तव्य समजून आपणासही समाजाचे काही देने लागते या भावनेतून लाॅकडाऊच्या संकट काळात कुठलीच प्रसिद्धी न करता जो अविरत सेवा केली.

    त्या सेवेला कुठलेही मोल नाही त्या उल्लेखनीय कामगिरी जनसेवेबध्दल याच केलेल्या सेवा कार्याचा सन्मान व्हावा म्हणून कंन्ट्रोल क्राईम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टीव्ह ट्रस्टच्या वतीने आॅनलाईन पुरस्कार यामध्ये कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी देऊन त्यांच्या केलेल्या जनसेवा कार्याची प्रशंसा केली, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळे आपण सर्वजण सुखरूप आहोत.

    अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे,असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केले, पुनम किशनराव पांचाळ लातुकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.