Advertisements
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
उमरी(दि.23सप्टेंबर):- तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज यासाठी शेतकऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली असून आतापर्यंत देना बँक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदा च्या शाखेला जागेअभावी नागरिकांना रस्त्या-रस्त्यावर थांबावे लागत आहे तर कर्मचारीसुद्धा कोरूना च्या नावाखाली नागरिकांना त्रास देत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या सर्व बँकांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज वाटप चालू असून कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे बँक ऑफ बडोदाच्या प्रशासनाचे या गर्दीवर कुठलेही लक्ष नसून याठिकाणी सोशल डिस्टंसिंग चा फजा उडत आहे.
तर तर बँकेतील बहुतांशी कर्मचारी आहे अनुपस्थित सुद्धा आहेत व दलालांकडून बँकेचे कर्मचारी हे कामे करून घेत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे यांची तात्काळ चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे नागरिकांचे मत आहे.