✒️माधव शिंदे (विशेष ,प्रतिनिधी) मोबा.७७५७०७३२६०
नांदेड(दि.27सप्टेंबर):- सोलापूर सोशल फाऊंडेशन २रे वर्धापन दिनानिमित्त केलेल्या कार्याचा दुसर्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यटनाला चालना मिळावी यातूनच विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने सोलापूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक आ.सुभाषबापू देशमुख, संचालक, सर्व सल्लागार मंडळींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सोलापूर फाउंडेशनच्या सल्लागार मंडळींना जागतिक पर्यटन दिनी विकसनशील पर्यटन गावास भेट देऊन त्याना प्रोत्साहन देण्यासाठी या सल्लागार समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचणी गावासारखी जिल्ह्यात अनेक पर्यटन केंद्र विकसित व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
सोलापूर सोशल फाऊंडेशन अध्यक्ष आ.सुभाष बापू देशमुख, संचालिका सौ.पूर्वाताई वाघमारे, सल्लागार रवींद्र मिणियार, बॉबी मेनन, भूषण कुलकर्णी, मेजर शामराव कदम,पांडुरंग वाघमोडे, प्रा. काटिकर सर,कृषिभूषण अंकुश पडवळे, शिवाजीराव पवार, उद्योजक अजित कंडरे, अमित जैन, विनायक सुतार, प्रदीप नागणेसाहेब ,सटरडे क्लब सोलापूरचे चेअरमन तारासिंग राठोड, मयूर येलपले, माजी पोलीस उपअधीक्षक माडगूळकर साहेब,मोहनजी अनपट,आनंद माळी साहेब, कृषी उत्पादक कंपनीचे चेअरमन श्री कुलकर्णी, सतीश काळे, गोविंद विभूते, सरपंच कुलदिप कौलागे, पंचायत समिती सदस्या पल्लवीताई कंडरे, गणेशजी बागल, समाधान गाजरेसर, सोमनाथ झांबरे, समीर पवार, शितल देशमुख, मेजर बोबडे, लोकरेसर, आदी मान्यवर व चिंचणी ग्रामस्थ उपस्थित होते.