✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागभीड(दि.27सप्टेंबर):-तालुक्यातील पारडी- बाळापुर जि.प.क्षेत्रातील मिंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा निधीतून मंजुर नवीन वर्गखोलीचे भुमीपुजन या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पं.स.सदस्या सौ.प्रणयाताई गड्डमवार यांची विशेष उपस्थिती होती.
मिंडाळा येथील नवीन ग्रामपंचायत चे लोकार्पण सोहळा प्रसंगी गावच्या सरपंच सौ.भाग्यश्रीताई मांदाडे व उपसरपंच विनोद हजारे यांनी शाळाव्यवस्थापन समितीच्या सुचनेनुसार जुनी इमारत जीर्ण झाल्याने शाळेत नवीन वर्गखोलीचे बांधकाम आवश्यक असल्यामुळे मंजूर करण्याची मागणी केली होती. या क्षेत्राच्या विकासासाठी कटीबध्द असलेले जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत जिल्हा निधीतुन नवीन वर्गखोलीचे बांधकामासाठी मंजुरी प्राप्त करून घेतली.जुन्या पडीत व धोकादायक शाळा इमारतीचे निर्लेखन लवकरात लवकर करण्याची सुचना या नवीन शाळा वर्गखोलीचे भुमीपुजन प्रसंगी संजय गजपुरे यांनी केली.
या भुमीपुजन प्रसंगी मिंडाळा येथील उपसरपंच विनोद हजारे, ग्रामसेविका श्रीमती उईके मँडम , केंद्रप्रमुख परमानंद बांगरे , ग्रा.पं.च्या सदस्या सौ.करुणा राखडे , सौ.खुशबु खंडाळे , शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य अरविंद मांदाडे , शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र हटवार सर , सहा. शिक्षक संतोष आंबोरकर , पंढरी पिसे, केवळराम मैंद व सौ.वत्सला ठाकुर यांचेसह गावातील पालकांचीही उपस्थिती होती.