डाॅ. महेश चोपडे यांची एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती

    47
    Advertisements

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.3ऑक्टोबर):- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डाॅ.महेश चोपडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कुलसचिव पदाचा कार्यभार गुरुवार (ता.1) रोजी स्वीकारला आहे. तर श्री शिवशरण माळी यांची विद्यापीठाचे कुलगुरु यांचे सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबददल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरु प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

    डाॅ.महेश चोपडे यांनी प्राध्यापक, संचालक आणि आधिष्टाता इ. महत्वाच्या पदांवर गेले अनेक वर्षपासून या संस्थेमध्ये काम केलेले आहे. तसेच डाॅ.चोपडे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये शोधनिबंध सादर केलेले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय व राज्यस्तरीय शिक्षण मंत्रालय यांचेकडील आदेशांचे व सूचनांचे पालन करुन एमआयटी एडीटी विद्यापीठाला जागतिक स्तरावरील अत्याधुनिक व नाविण्यपूर्ण शिक्षण प्रदान करणारे विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

    एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी घालून दिलेली मूल्याधिषटीत शिक्षणाची परंपरा यापुढे अविरत सुरु ठेवण्यासाठी व त्याव्दारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही सर्व कटीबध्द आहोत अशी भावना डाॅ.महेश चोपडे यांनी यावेळी व्यक्त केली.