भालगाव येथील वस्तीवाढीसह स्मशानभूमीची नोंद गाव नमुना सातबाराला घेण्याची मागणी

    53
    Advertisements

    ?वंचित बहूजन आघाडीच्या वतीने तहसीलदाराना निवेदन

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

    केज(दि.3ऑक्टोबर):- केज तालुक्यातील भालगाव येथील वस्तीवाढीसह स्मशानभूमीची नोंद गाव नमुना सातबाराला घेण्यासाठीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.याबाबद सविस्तर वृत्त असे की भालगावं हे गाव मांजरा धरणामुळे पुनर्वसित झालेले आहे सर्वे नंबर 45 मध्ये गावचे पुनर्वसन करण्यात आले आहे त्यापैकी 2 हेक्टर 62 आर मध्ये वस्ती वाढ करण्यात आली व 81 आर जमीन स्मशानभूमीसाठी आहे.

    तशा खुणा त्या वेळी कायम करण्यात आल्या तसे आजही नाकाशात दिसून येते परंतु तशी नोंद गाव नमुना सातबारा ला घेण्यात आली नाही त्यासाठी संबंधित कार्यालयाशी निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला त्याचबरोबर ग्रामपंचायत चा ठराव देखील देऊन 1 वर्ष उलटले असल्यामुळे या बाबतीत तहसीलदार साहेब यांनी लक्ष घालून वस्तीवाढीसह स्मशानभूमीची नोंद गाव नमुना सातबाराला घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात करण्यात आली.

    यावेळी अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष बीड पूर्व, शिवराज बांगर जिल्हाध्यक्ष पश्चिम,जिल्हाउपाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, जिल्हा महासचिव सुदेश सिरसाठ,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग, बाबासाहेब मस्के तालुकाध्यक्ष केज, ता.संघटक विशाल धिरे, ता.सचिव नवनाथ पौळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन नेते अक्षय बचुटे गोटेगांवकर,अजय भांगे,बाबा मस्के यांच्या स्वाक्षरी आहेत.