विश्व मराठी संमेलन 2021′(ऑनलाईन) च्या संमेलन प्रतिनिधी पदी शिरुर चे डाॅ.नितीन पवार यांची निवड

    97
    Advertisements

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.11ऑक्टोबर):-जगातील पहिले ऑनलाईन विश्व मराठी संमेलन ‘ दिनांक 28,29,30 व 31जानेवारी 2021या चार दिवसांत होणार आहे.हे संमेलन ‘विश्व मराठी परिषदे’ने आयोजित केले आहे. या संमेलनासाठी एक संमेलन प्रतिनिधी म्हणून शिरुरचे डाॅ. नितीन पवार यांची निवड झाली आहे.

    डाॅ. नितीन पवार हे पत्रकार, कवी,लेखक, ब्लॉग लेखक व सामाजिक/राजकीय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांचे ब्लॉग 40 पेक्षा जास्त देशांत वाचले गेले आहेत. त्यांच्या निवडीचे मित्र व शिरुर सह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक लोकांनी अभिनंदन केले आहे.

    जगातील या पहिल्या ऑनलाईन विश्व मराठी संमेलनात ( विश्व मराठी युवा संमेलनासह ) 27 देशांतील महाराष्ट्र मंडळे,ब्रहन् महाराष्ट्र मंडळ आॅफ अमेरिका, छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार,14 राज्ये, 300 पेक्षा जास्त महाविद्यालये, 120 पेक्षा जास्त सहयोगी संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

    या संमेलनाचे महा संमेलनाध्यक्ष पद डाॅ. अनिल काकोडकर ,पद्मविभुषण, महाराष्ट्र भूषण, महा स्वागताध्यक्ष पद सुमित्राताई महाजन, माजी सभापती, लोकसभा तर महा संरक्षण पद डाॅ. विद्या जोशी, अध्यक्ष, ब्रहन् महाराष्ट्र मंडळ आॅफ अमेरिका हे मान्यवर भूषविणार आहेत.

    या जगातील पहिल्या वहिल्या आॅनलाईन मराठी संमेलनामध्ये प्रबोधन, परिसंवाद,कविता, कथा,संस्कृती, आयडिया, मनोगत कट्टा तसेच प्रदर्शने यांची भरगच्च मेजवानी जगभरातील मराठी प्रेमी व मराठी साहित्य प्रेमी मराठी व इतर लोकांना मिळणार आहे. अधिक माहीती व संमेलनास जोडले जाण्यासाठी मोबाईल नं. 7030411506,7843083705/7776033958 आणि 7066251252 ( व्हाॅटसअप) वर संपर्क करण्याचे आवाहन डाॅ. नितीन पवार यांनी केले आहे.