?परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620
बीड(दि.12ऑक्टोबर):-जिल्ह्यासह तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून गेला तरीही जर सरकार आणि प्रशासन पाहणी आणि पंचनामे करत बसणार असेल तर तुमचे पाहणी, पंचनामे बस्स झाले.
आता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज असून सरकारने लवकरात लवकर मदत करावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे युवा नेते शेतकरी पुत्र अक्षय शिंदे यांनी दिला आहे.
जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पाऊस चांगला झाल्याने पिके जोरदार आली होती शेतकऱ्यामध्येही पिके चांगली आल्याने आनंदाचे वातावरन होते मात्र पिके काढणीस सुरुवात झाली कापूस वेचणीस सुरुवात झाली अन् परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. यामुळे शेतकरी वर्ग फार चिंतेत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच दुःख समजून घेत सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करावी.
राज्य सरकार नुसते पाहणी, पंचनामे करत असून आश्वासनाचे गाजर दाखवने सरकारने बंद करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आदोलन छेडण्यात दण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम ता.अध्यक्ष उत्तम बप्पा पवार, रामेश्वर गवळी युवक ता. उपाध्यक्ष तसेच शिवसंग्रामचे युवा नेते अक्षय शिंदे यांनी दिला आहे.