महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही

    58
    Advertisements

    ?पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.12ऑक्टोबर):-कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही, असे आढळल्यास पँथर स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.

    सध्या देशात मनुवादी आरएसएस प्रणित सरकार सत्तेत आल्यापासून महामानवांच्या प्रतिमा व पुतळे यांची विटंबना केली जात असून सामाजिक समतोल बिघडविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे, महामानवांच्या विचारांना तिलांजली देऊन राष्ट्राची एकता व अखंडता बाधित केली जात आहे.

    राजकारणी लोक याची पोळी भाजून आपले राजकारण करत आहेत हे अशोभनीय आहे.महामानवांच्या वंशजांना जाणून बुजून हेतुपुरस्करपणे अवमानकारक वक्तवे करून जातीय हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत आहे. महामानवांचे वंशज आपापल्या परीने वैचारीक मतभेदातून लढत असले तरी ते देशाला आदरणीय आहेत, ते एकमेकांमध्ये ऋणानुबंधनांत अडकलेले असतात, मात्र; चिंधीचोर औकात नसलेल्यानी वंशजांच्या वैचारिक मतभेदाचे राजकारण करून कुणाबद्दलही अवमानकारक वक्तवे करू नये.

    अन्यथा पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय सामाजिक लढवय्या संघटनेकडून पँथर स्टाईल धडा शिकवला जाईल असे मत संघटनेचे संथापक महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

    राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य टिकावे यासाठी अथक परिश्रम केले जात असून कार्याध्यक्ष पँथर श्रावण गायकवाड, उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे, सचिव सचिन भूटकर, संघटक राजेश पिल्ले यांच्या देखरेखीखाली अवमान करणाऱ्याला समज देण्यासाठी एक पथक निर्माण केले असून अश्या माथेफिरूवर कायदेशीर कार्यवाहीचे सत्र चालू असल्याची माहिती संस्थापक कार्याध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी दिली आहे.