✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620
बीड(दि.12ऑक्टोबर):-शेतकरी हा अनेक अडचणींच्या माध्यमातून शेतातील पांढरा सोना नावाचा कापूस उत्पादित करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही दिवसापासून शेतकरी हा अडचणींचा सामना करून शेतातील कापूस सोयाबीन उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत असताना त्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाच्या सूत्रधार पडल्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला आलेला असून शेतकऱ्यांच्या पदरी कायम उपेक्षाच राहिल्या आहेत.
सातत्याने कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांचा जीव घेत आहे माझा शेतकरी मायबाप शेतामध्ये काबाडकष्ट करून हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी करुन मोत्याचे दाणे पिकवतो पण त्याच्या पदरी कायम उपेक्षाच राहते या परिस्थितीमध्ये शासनाने तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी पुढे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
की केले आहे परंतु आता दोन दिवसापासून सततधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हातातोंडाशी आलेला कापसाचा घास वायाला गेला आहे शेतामध्ये असलेला कापूस फुटुन वेचणीच्या वेळेस पावसाने खूप मोठ्या प्रमाणात सतत धार 24तास पाऊस चालू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा असलेला कापूसाच्या वाती तयार झालेल्या आहेत तर सोयाबीन हे काळे पडले आहे.
शेतकऱ्यावर हे सुलतानी संकट आलेले असून शासन-प्रशासन आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याबाबत विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा असे देखील दिलेले प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.